Amol Mitkari: 'अकोले मतदारसंघात अमित भांगरेंचे भंगार करायची वेळ आलीय' ; मिटकरींचे टीकास्त्र!

Amol Mitkari Criticized Amit Bhangre: ...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाने तत्काळ माफी मागावी, अशीही मागणी मिटकरींनी केली आहे.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Akole Assembly Constituency: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांकडून बंडखोरी शमवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ४ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहेत. तत्पुर्वी राजकीय पक्ष बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे नेते मंडळींचे विरोधी पक्षांवर आरोपही सुरू आहेत.

याच दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(NCP) - शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित भांगरे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आल्याचे समोर आल्याने नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत.

Amol Mitkari
Maharashtra BJP: विरोधकांनो सावधान..! मोदी-शहांच्या प्रचारसभांचा झंझावात महाराष्ट्रात येतोय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेआमदार अमोल मिटकरी यांनी यावरून ट्वीटद्वारे टीका देखील केली आहे, 'अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदार संघाचे तुतारीचे उमेदवार अमिल भांगरेची तुलना "छत्रपती शिवाजी महाराजांसोबत" करून तुतारी गटाने परत एकदा आपल्या अकलेचे दिवाळे पाजळले आहेत. अकोले मतदारसंघात भांगरेंचे भंगार करायची वेळ आलीय. तुतारी गटाने तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी.' अशी मागणी मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचे उदाहरण देताना, अमित भांगरे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. अमित भांगरे सह्याद्री कुशीतील छत्रपती असल्याचं सावंत यांनी म्हटलेलं आहे.

Amol Mitkari
Narendra Jichkar News : नागपूरमध्ये नरेंद्र जिचकारांची बंडखोरी शमवण्याचे काँग्रेससमोर आव्हान!

दशरथ सावंत भाषणात नेमकं काय म्हणाले होते ? -

'छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान सारख्या राक्षसाचे वाघनखं पोटात घालून पोट फाडले. आमची वाघनखं 'या' छत्रपतीच्या हातामध्ये. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी जन्माला आलेल्या छत्रपतीच्या हातात आम्ही ही वाघनखं देतोय. अमित भांगरे तुम्ही या राज्यातील भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा कोथळा बाहेर काढा.' असं दशरथ सावंत यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com