Amravati ayan ahmed video scandal : 'लव्ह गुरू'च्या टिप्स वापरून मुलींना अडकवत होता जाळ्यात; अमरावती प्रकरणातील धक्कादायक खुलासे

Amravati crime news ayan ahmed case : अमरावतीतील धक्कादायक प्रकरणात एका व्यक्तीने ‘लव्ह गुरू’च्या टिप्स वापरून मुलींना जाळ्यात अडकवल्याचे उघड. संपूर्ण माहिती वाचा.
Ayan Ahmed Tanveer
Ayan Ahmed TanveerSarkarnama
Published on
Updated on

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण भाग हादरून गेला आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून विशेष तपास पथकाकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने नियोजनपूर्वक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, यासाठी त्याने एका तथाकथित ‘लव्ह गुरू’ची मदत घेतल्याचा मोठा खुलासा झाला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अयानने आपल्या मित्र मानव सुगंधे यांच्या कठोरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटचा 7 ते 8 वेळा वापर केला होता. या ठिकाणीच काही मुलींना नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. पोलिसांनी या फ्लॅटच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले असून, त्याला या प्रकाराची माहिती होती का याची सखोल चौकशी सुरू आहे.

Ayan Ahmed Tanveer
Vidhan Parishad Maharashtra politics : विधान परिषदेत ठाकरे गटाची नवी खेळी; उद्धव ठाकरे यांच्या जागी 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर!

अयान मुलींशी संपर्क साधण्यासाठी एक वेगळीच पद्धत वापरत होता. तो थेट “तू तीच आहेस ना जी मला तिथे भेटली होतीस?” असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न विचारून संवाद सुरू करत असे. या प्रश्नामुळे समोरची मुलगी गोंधळून जात असे आणि स्वतःहून अधिक माहिती देत असे. याच संधीचा फायदा घेत तो हळूहळू तिच्याशी जवळीक वाढवत असे.

तपासात असेही उघड झाले आहे की, अयानला दोन वर्षांपूर्वी एका तरुणाने संवाद कौशल्य आणि मुलींना कसे आकर्षित करायचे याचे प्रशिक्षण दिले होते. हाच व्यक्ती ‘लव्ह गुरू’ म्हणून ओळखला जात असून, आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Ayan Ahmed Tanveer
Fake Godman Arrest : भोंदूगिरीचा खेळ संपला; 'अंनिस'च्या सापळ्यात ‘महाराज’ अडकला, संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक

या संपूर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियाचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com