Vidhan Parishad Maharashtra politics : विधान परिषदेत ठाकरे गटाची नवी खेळी; उद्धव ठाकरे यांच्या जागी 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर!

Thackeray faction new leaders Vidhan Parishad : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गटाची विधान परिषद निवडणुकीत नवी रणनीती दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या जागी दोन नेत्यांची नावे आघाडीवर येत आहेत. सविस्तर वाचा.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Shivsena Thackeray Group : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 12 मे रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. रिक्त असलेल्या 9 जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली असून, या जागेसाठी ठाकरे गटात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जागी कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या एका जागेसाठी सध्या दोन प्रमुख नावे आघाडीवर असल्याचे दिसते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. दोघांनीही आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि सातत्याने सरकारवर टीका केल्यामुळे पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Uddhav Thackeray
Legislative Council Elections : एकनाथ शिंदेंचा 'या' नावाला हिरवा कंदील, विधान परिषदेची उमेदवारी महिला नेत्याला!

अंमबादास दानवे नुकतेच विधान परिषदेतून निवृत्त झाले असून, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला होता. विविध भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. त्यामुळे त्यांची प्रतिमा आक्रमक आणि अभ्यासू नेते अशी तयार झाली आहे.

दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनीही अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये सरकारला अडचणीत आणले आहे. पुणे आणि सातारा येथील ड्रग्ज प्रकरण, महिला अत्याचार आणि इतर मुद्द्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे नावही या शर्यतीत मजबूत मानले जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत जाणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यांनी निवडणूक न लढवण्याचा संकेत यापूर्वी दिला होता. मात्र, जर ते उमेदवार असतील तर काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

याशिवाय ठाकरे गटातील इतर काही नेते देखील इच्छुक आहेत. यामध्ये माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक आणि पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांची नावेही चर्चेत आहेत. एकूणच, या एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे.

Uddhav Thackeray
Priyanka Chaturvedi News : उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रियांका चतुर्वेदींची भूमिका, महिला आरक्षण बिल नामंजूर होताच म्हणाल्या, 'मी...'

उद्धव ठाकरे स्वतः निवडणूक लढवतात की इतर कोणाला संधी देतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com