Beed Crime : बीडमधील पिस्तुलधाऱ्यांची अंजली दमानियांनी रांगच लावली! मुंडेंवर एकामागोमाग एक प्रहार

Anjali Damania Beed News Dhananjay Munde Kailas Phad : बीड पोलिसांनी कैलास फड याला गुरूवारीच अटक केली आहे. त्याचाही पिस्तुलातून गोळी झाडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Anjali Damania Tweet
Anjali Damania TweetSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्याकडून जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यांनीच काही दिवसांपूर्वी कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून सातत्याने हातात असलेल्या व्यक्तींचे फोटो ट्विट केले जात आहेत.

दमानिया यांच्याकडून बीडमधील गुन्हेगारीवर सातत्याने ट्विट करत नेत्यांवर वार केला जात आहे. कैलास फड व्हिडिओ फोटो ट्विट केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि गुरुवारी पोलिसांनी अटकही केली. फड हा मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप दमानियांनी केला आहे. गुरूवारी त्यांनी खुद्द धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तूल असल्याचा फोटो पोस्ट केला होता.

Anjali Damania Tweet
Dharashiv Sarpanch Attack : बीडनंतर आता धाराशिव हादरलं! पुन्हा सरपंच 'टार्गेट'; दगडाने गाडीच्या काचा फोडत अन् पेट्रोल टाकून...

आणखी एका व्यक्तीचा पिस्तुल हातात घेतला फोटो ट्विट करत त्यांनी गुरूवारी महाराष्ट्रातील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले होते. शुक्रवारीही ही साखळी कायम राखत दमानियांनी दोन ट्विट केले आहेत. दोन्ही ट्विटमध्ये त्यांनी दोन व्यक्तींचे हातात पिस्तुल घेतलेले फोटो पोस्ट केले आहेत.

दोन्ही ट्विटमध्ये संबंधित व्यक्ती धनंजय मुंडेंसोबतचा फोटोही दमानियांनी पोस्ट केला आहे. संबंधित व्यक्तींचे नावेही दमानियांनी ट्विटमध्ये टाकली आहेत. दोन्ही पोस्टमध्ये त्यांनी पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांना तपासाचे आवाहन केले आहे.

Anjali Damania Tweet
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'मी कोणालाही सोडणार नाही'

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात संताप व्यक्त केला जात असतानाच तुलझापूर तालुक्यातील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरही गुरूवारी रात्री जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवर पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com