Anganwadi ASHA Workers BLO Duty : आंदोलनाला यश? बीएलओ कामाची सक्ती नसणार; अंगणवाडी-आशासेविकांसमोर आयोगाची माघार

Anganwadi and ASHA workers protest against compulsory BLO duties : बीएलओ म्हणून अतिरिक्त कामाच्या सक्तीविरोधात आझाद मैदानात आंदोलन; निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आश्वासन
Anganwadi ASHA Workers BLO Duty
Anganwadi ASHA Workers BLO DutySarkarnama
Published on
Updated on

Election Duty Maharashtra : मुंबईतील आझाद मैदानावर सहाय्यक बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून अतिरिक्त काम करण्याच्या सक्तीविरोधात अंगणवाडी कर्मचारी आणि आशासेविकांनी आंदोलन केले.

आंदोलनानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून बीएलओचे काम जबरदस्तीने दिले जाणार नाही. तसेच काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही प्रशासकीय कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती कृती समितीने दिली.

सहाय्यक बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून अतिरिक्त काम करण्याच्या सक्तीविरोधात राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि आशासेविकांनी मंगळवारी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर आंदोलन केले. अतिरिक्त कामाचा वाढता ताण कमी करावा आणि निवडणुकीसंबंधित कामे सक्तीने देणे थांबवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

राज्य अंगणवाडी कर्मचारी (Worker) कृती समिती आणि राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर पूर्वप्राथमिक शिक्षण, बालकांचे पोषण, गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण, गृहभेटी, सर्वेक्षण, टीएचआर वाटप, मातृत्व वंदना योजना आदी जबाबदाऱ्या आधीच आहेत. अशा परिस्थितीत सहाय्यक बीएलओचे अतिरिक्त काम करण्यास सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

Anganwadi ASHA Workers BLO Duty
Anna Hazare Protest : दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; आता अण्णा हजारे मैदानात, आंदोलनाचे हत्यार उपसले, पंतप्रधानांना धाडले पत्र

आशासेविकांनीही पावसाळ्यात मलेरिया, डेंगी, अतिसार यांसारख्या साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे लागते. अशा वेळी निवडणूक कामांचा अतिरिक्त भार पडल्यास आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Anganwadi ASHA Workers BLO Duty
BJP On Abhijeet Dipke : 'अभिजित दीपके भविष्यात भीम आर्मीच्या तिकिटावर निवडणूक लढवतील'; निशिकांत दुबे यांचा दावा

निवडणुकीच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याची तसेच अनेक देयके प्रलंबित असल्याची तक्रारही आंदोलकांनी केली. त्यामुळे सहाय्यक बीएलओचे काम अंगणवाडी कर्मचारी आणि आशासेविकांवर सोपविण्याऐवजी बेरोजगार सुशिक्षित युवक-युवतींची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

मुख्य मागण्या

सहाय्यक बीएलओचे काम सक्तीने देऊ नये. कामास नकार देणाऱ्यांवर कारवाई करू नये. निवडणूक कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करावे. प्रलंबित मानधन व निवडणूक कामाचा मोबदला वेळेत द्यावा, अशा मुख्य मागण्या केल्या आहेत.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन

आंदोलनानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी शिष्टमंडळाशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली. सहाय्यक बीएलओचे काम जबरदस्तीने लादले जाणार नाही तसेच हे काम नाकारणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी किंवा आशासेविकांवर कोणतीही प्रशासकीय कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती कृती समितीने दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com