Anil Deshmukh : विकृत मानसिकता म्हणत अनिल देशमुखांनी मानले फडणवीसांचे आभार; काय आहे प्रकरण?

CBI Devendra Fadnavis NCP Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिक्षकांवर दबाव टाकल्याप्रकरणी बुधवारी देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा अडचणीत आले आहेत. पोलिस अधिक्षकांवर दबाव टाकल्याच्या आऱोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर देशमुखांची त्यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

भाजप नेते गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्यासाठी जळगावचे तत्कालीन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप देशमुखांवर आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुखांनी फडणवीसांचे आभार मानत जोरदार टीका केली आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Maval Congress : मोठा राजकीय भूकंप? 'या' बड्या नेत्यानं काँग्रेसची साथ सोडली; अजित पवार गटाच्या वाटेवर...

काय म्हणाले अनिल देशमुख?

धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस अशी सुरूवात करत देशमुख यांनी म्हटले आहे की, माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले असल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधल्याचेही देशमुखांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असे देशमुख म्हणाले आहेत.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Hasan Mushrif : सावध झालेल्या मुश्रीफांनी 'वस्तादा'वर टाकलेला प्रतिडाव उलटण्याचा धोका

काय आहे प्रकरण?

अनिल देशमुख गृहमंत्री असताना गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी देशमुखांकडून मुंढेंवर दबाव टाकला जात होता, असा आरोप आहे. मुंढे यांनीच तसा जबाब सीबीआयकडे दिला आहे. महाजनांवर मोक्काअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेतच महाजनांना अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यांनी पेनड्राइव्हमध्ये स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. चव्हाण यांना अटक करण्यात आली. आता देशमुख यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com