Anjali Damania News : कमी दरात दमानियांना घरपोच कीटकनाशक! घोटाळ्याचा दावा करत चौकशीची पुन्हा केली मागणी

Anjali Damani purchases pesticides online at a lower price than the Agriculture Department, sparking controversy and accusations of a farming scam. : मी दोन्ही मिळून 493 दिले जीएसटी सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने नॅनो डीएपी घेतलं त्याच्या पेक्षा 100 रुपये कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण 1 बाटली आणि ती पण घरपोच.
Anjali Damania-Dhananjay Munde News
Anjali Damania-Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री असतानाच्या काळात शेतकऱ्यांसाठी खरेदी केलेल्या खत, कीकटनाशक, फवारणी यंत्र व इतर साहित्य खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यावर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढत कृषी विभागाने केलेली खरेदी, त्याचा दर कसा योग्य आहे हे स्पष्ट केले होते.

दरम्यान, मंत्री पदावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पायउतार झाल्यानंतर अंजली दमानिया अधिक आक्रमक झाल्या आहेत. अनेक आरोप करत त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही दमानिया यांनी लावून धरली आहे. कृषी विभागातील घोटाळ्यावर ठाम राहत अंजली दमानिया यांनी आॅनलाई इफ्को कंपनीचे काही प्रोडक्ट आॅनलाईन मागवत त्याची किंमत आणि कृषी विभागाकडून हीच कीटकनाशक कशी महागड्या दराने खरेदी करण्यात आली आहेत, हे पुराव्यासह समोर आणले आहे.

आता तरी कृषी विभागाच्या घोटाळ्याची चौकशी करणार का? असा संतप्त सवाल करतानाच विरोधी पक्ष नेमकं काय करतोय? अशी विचारणाही त्यांनी 'एक्स'वरील पोस्टच्या माध्यमातून केली आहे. इकडे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अशावेळी अंजली दमानिया (Anjli Damania) यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळातील भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्याने समोर आणला आहे.

Anjali Damania-Dhananjay Munde News
Anjali Damania News : दमानियांचा इशारा अन् फडणवीसांचा मेसेज; लगेच घेतली माघार, काय सांगितलं? 

कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, असा प्रश्न विचारत विरोधी पक्ष काय करतोय? नाना पटोले, जयंत पाटील, अंबादास दानवे असा रोखठोक सवाल दमानिया यांनी केला आहे. आज मी घरपोच मागवलेली आॅनलाईन इफ्कोच्या प्रॉडक्टची डिलीवरी मिळाली. नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाची एक एक बाटली (500 ml) एकूण 493 रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे. नॅनो युरिया मी घेतली 127 रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या 19 लाख ६८ हजार बाटल्या 220 रुपयाला ?

Anjali Damania-Dhananjay Munde News
Dhananjay Munde : वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना बीडच्या राजकारणात मित्रच उरला नाही; 'या' बड्या नेत्याने केला दावा

नॅनो डीएपी मी घेतली 342 रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली 19 लाख 57 हजार बाटल्या 590ला ? मी दोन्ही मिळून 493 दिले जीएसटी सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने नॅनो डीएपी घेतलं त्याच्या पेक्षा 100 रुपये कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण 1 बाटली आणि ती पण घरपोच, असा दावा दमानिया यांनी बील सादर करत केला आहे. तसेच आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ? असा प्रश्नही सरकारला विचारला आहे.

Anjali Damania-Dhananjay Munde News
Dhananjay Munde On Suresh Dhas Statement : माझ्या आईवर खोटे आरोप केले तर गप्प बसणार नाही! धनंजय मुंडेंचा इशारा

आॅनलाईन घरपोच आलेल्या काॅम्बो कीटकनाशकाची किंमत आणि कृषी विभागाने खरेदी केलेल्या बाटल्यांची संख्या आणि किंमत यातील तफावत दमानिया यांनी आकेडवारीसह मांडली. त्यानूसार MAIDC कॉम्बोची सरकारला पुरवठा किंमत 590+220 अशी एकूण 810 रुपये आकारण्यात आली आहे. तर हीच ऑनलाइन कॉम्बो खरेदी किंमत 493 आहे. म्हणजेच सरकारने खरेदी केलेल्या किमंतीपेक्षा 317 रुपये कमी.

Anjali Damania-Dhananjay Munde News
Anjali Damania : अजितदादा ते धनुभाऊ... 'दमानियांच्या' राजकीय आरोपांच्या बॉम्बने घायाळ झालेले नेते

317 रुपया प्रमाणे सरकारने खरेदी केलेल्या 1950000 बाटल्यांची किमंत 61,81,50000/ म्हणजे 61 कोटी 85 लाख होते. सरकारने जर मोठ्या प्रमाणात कॉम्बोची आॅर्डर दिली होती तर निश्चितच ही किंमत 493 पेक्षा कमी असायला हवी. अशी मांडणी करत अंजली दमानिया यांनी या खरेदीतील घोटाळ्याचा दावा करत चौकशीची मागणी केली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com