Anjali Damania: अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा निशाणा! म्हणाल्या, मंत्रीपदी पुन्हा...

Anjali Damania: धनजंय मुंडे यांनी रायगडमधील एका कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं आपल्याला पुन्हा मंत्रीपदाची संधी देण्याची सूचकपणे मागणी केली आहे.
Anjal Damania  Dhananjay Munde
Anjal Damania / Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Anjali Damania: रायगड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं आपल्याला पुन्हा मंत्रीपदी संधी मिळावी, अशी सूचकपणे मागणी केली. पण त्यांच्या या मागणीवर सामाजिक कार्यकर्त्या आणि जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या अंजली दमानिया यांनी विरोध केला आहे. मुंडेंना पुन्हा एकदा निशाणा बनवताना त्यांना कुठल्याही परिस्थितीत पुन्हा मंत्रीपद देण्यात येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Anjal Damania  Dhananjay Munde
Air India Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट्सची खरंच चूक होती का? सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी; DGCIला पाठवली नोटीस

एका व्हिडिओ संदेशाद्वारे अंजली दमानिया यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, या माणसाला मंत्रिमंडळात संधी देऊ नका तसंच जनतेच्या कुठल्याही पदावर त्याला घेऊ नका. हवं असेल तर त्यांना पक्षांतर्गत काम करण्याची संधी द्या पण मंत्री बनवू नका, असं आवाहन दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केलं आहे.

Anjal Damania  Dhananjay Munde
Bandu Aandekar: गणेश पेठ फिश मार्केटमधील 'बडा मासा' उकळत होता कोट्यवधीची खंडणी; आकडा ऐकून पोलिस चक्रावले!

दरम्यान, काल रायगड इथं राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी पक्षाकडं तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना साकडं घातलं. "कायम आमचं मार्गदर्शन करत राहावं, चुकलो तर कान धरावा. नाही चुकलो तर चालतंय पण आता रिकाम ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या हीच विनंती करतो" असंही त्यांनी म्हटलं.

Anjal Damania  Dhananjay Munde
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांनी वाढवला महायुतीमधील गुंता; म्हणाले ‘त्या 29 जागांवरच चर्चा होईल’

मुंडेंच्या विनंतीला तटकरे यांनी प्रतिसाद देताना म्हटलं की, "त्यांनी म्हटलं मला काम द्या त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतो. योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय होईल. कारण त्यांनी राजीनामा दिला होता. काही कारणांमुळं त्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे त्यामुळं त्यांच्या संदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी आणि युतीचे नेते मुख्यमंत्री आणि अजित पवार हे एकत्रितपणे बसून घेतील"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com