Air India Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट्सची खरंच चूक होती का? सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी; DGCIला पाठवली नोटीस

Air India Plane Crash Update: अहमदाबाद-लंडन एअर इंडियाच्या ड्रिमलायनर विमान अपघात प्रकरणी पायलट्स कसे चुकीचे होते, याबाबत सुरु असलेल्या अफवांबाबत किंवा नरेटिव्हबाबत सुप्रीम कोर्टानं आज महत्वाची टिप्पणी केली.
Air India plane crash investigation report AAIB
Air India plane crash investigation report AAIBSarkarnama
Published on
Updated on

Air India Crash: अहमदाबाद-लंडन एअर इंडियाच्या ड्रिमलायनर विमान अपघात प्रकरणी पायलट्स कसे चुकीचे होते याबाबत सुरु असलेल्या अफवांबाबत किंवा नरेटिव्हबाबत सुप्रीम कोर्टानं आज महत्वाची टिप्पणी केली. तसंच यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस देखील पाठवली आहे. या अपघाताची स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

Air India plane crash investigation report AAIB
Nilesh Lanke on Devendra Fadnavis : 'यांचं कसं आहे, पोटात एक अन् ओठात एक'; CM फडणवीसांवर खासदार लंकेंचा निशाणा (VIDEO)

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, या अपघाताच्या प्राथमिक तपास अहवाल हा निवडक पद्धतीनं लीक झाला आहे. त्यानुसार, काही विदेशी मीडियाला एअर इंडियाच्या पायलट्सला दोषी ठरवण्यासाठी नरेटिव्ह तयार करण्यासाठी मदत होत असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. या सिलेक्टिव्ह लीकला सुप्रीम कोर्टानं दुर्दैवी असं संबोधलं आहे. जोपर्यंत याप्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत संपूर्ण गोपनियता राखणं खूपच महत्वाचं आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या जनहित याचिकेवर सुनावणी सुरु आहे. यावेळी न्या. सूर्यकांत यांनी म्हटलं की, तुकड्यांमध्ये प्राथमिक चौकशी अहवाल लीक करण्याऐवजी नियमित चौकशीतून तार्किक निष्कर्ष निघेपर्यंत लोकांनी शांत राहायला हवं.

Air India plane crash investigation report AAIB
Jitendra Awhad : गोपीचंद पडळकरांचे उट्टे काढण्यासाठी जितेंद्र आव्हाड पुन्हा सरसावले : विधानभवनातील राड्यानंतर थेट सांगलीत जाऊन भिडले

पायलट्सना दोष देणारं नरेटिव्ह दुर्दैवी

सुनावणी दरम्यान कोर्टानं या बाबीवर जोर दिला की, जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही अफवा आणि चर्चांपासून दूर राहिलं पाहिजे. याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी कोर्टाला सांगितलं की, प्राथमिक चौकशी अहवालात पायलटच्या चुकीकडं इशारा दिला होता, याला अनेक मीडियानं भाष्य केलं आहे. यावर न्या. सूर्यकांत म्हणाले, हे अत्यंत दुर्देवी होतं. यासाठी त्यांनी अमेरिकन वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलमधील बातमीचा हवाला देताना म्हटलं की, यांनी प्राथमिक रिपोर्ट प्रसिद्ध होण्यापूर्वीच विमानाच्या पायलट्सना दोषी ठरवून टाकलं. अनेक माध्यमांनी पायलट्सबाबत म्हटलं की, ते आत्मघाती होते. जर ते आत्मघाती होते तर १०० असे इतर प्रकारही घडू शकले असते, पण या सर्व बातम्या मूर्खपणा आहेत.

Air India plane crash investigation report AAIB
Pakistan Politics : पाकिस्तानी नागरिकांना स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे का?

केंद्राला आणि DGCIला नोटीस

न्या. सूर्यकांत यांनी म्हटलं की, अशा प्रकारच्या बातम्या या बेजबाबदार होत्या, अशा घटनांमध्ये गोपनियता महत्वाची आहे. शेवटी कोर्टानं एका तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून निष्पक्ष, वेगवान आणि स्वतंत्र चौकशीच्या मागणीवरुन केंद्र सरकार आणि DGCIला नोटीस पाठवली आहे.

Air India plane crash investigation report AAIB
वय वर्ष 65 तरी दिसतात तरुण, काय आहे गिरीश महाजनांच्या फिटनेसचे रहस्य?

बोईंड ड्रिमलाईनरच्या अपघातात २६० जणांचा मृत्यू

१२ जून २०२५ हून अहमदाबादहून लंडनच्या गेटविक विमानतळाकडं जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एअर इंडियाचं AI 171 Boeing 787-8 Dreamliner हे विमान अपघातग्रस्त झालं होतं. या अपघातात विमानात असलेल्या २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याशिवाय विमान एका इमारतीवर पडल्यामुळं त्यातील १९ जणांचा अशा एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com