Satej Patil : सतेज पाटलांचे मोठे विधान; म्हणाले, 'प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, वेगळे लढल्याने...'

Satej Patil statement News : वेगळे लढल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, असे काही होणार नाही. महायुतीमध्ये देखील जिथे शक्य असेल तिथे युती करणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News :आघाडीमध्ये यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना देखील अनेक महापालिका वेगवेगळ्या लढल्या आहेत. तीन पक्षाची भूमिका जिथे शक्य होईल तिथे युती करणार अशीच आहे. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ आम्ही एकत्र बसून धोरण ठरविणार आहोत. कोल्हापुरात आमची युती व्हायला काही अडचण येणार नाही असे वाटते. वेगळं लढल्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, असे काही होणार नाही. महायुतीमध्ये देखील जिथे शक्य असेल तिथे युती करणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते, असे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्ष हा मोठा पक्ष आहे. जिथे स्वबळावर लढण्याची संधी असेल त्याठिकाणी आम्ही ही लढू. 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्यानंतर कळेल महापालिका निवडणुका लागणार का ? निवडणूक आयोग सर्व निवडणुका पावसाळ्याच्या अधिक घेऊ शकतो का ? हा मोठा प्रश्न आहे. कोणत्या निवडणुका पहिले होणार त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत, असेही ते म्हणाले.

Satej Patil
Santosh Deshmukh Murder Case : बीड पोलिस, 'CID', 'SID'कडून निसटला 'हा' गंभीर मुद्दा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोग 'अ‍ॅक्शन मोड'वर

विधानसभा आणि महानगरपालिकेचा पॅटर्न वेगळा आहे. मुंबई महानगरपालिकेत पूर्वी काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं देखील ताकद आहे. सध्या राज्यातील जनता प्रशासनाच्या कारभाराला कंटाळलेली आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेवर ठेवलेल्या कंट्रोलला जनता कंटाळली आहे. यामुळे जनता कौल आमच्या बाजूने देईल. ओबीसी आरक्षण एक याचिका आणि प्रभाग रचनेवरची एक याचिका सुप्रीम कोर्टात आहे. 22 तारखेला काय निर्णय लागतो त्यावर सगळं पुढे ठरणार आहे त्यानंतर आम्ही सामोरे जाऊ, असे सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले.

Satej Patil
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खूनप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई; सातही आरोपींवर मोकाची कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) हे मतदार आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करत आहेत. सहानुभूती दाखवून विधानसभेला जे केलेला आहे ते दिसून आले आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल, असे वाटत नाही. सरकारच्या चांगल्या कामाला कोणी पाठिंबा देणार नाही, असे होणार नाही. मात्र, चुकीच्या कामावर बोट ठेवणं हे आमची जबाबदारी असते. अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावरून आम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू, असेही त्यांनी यावेळी बोलताना केले.

Satej Patil
Devendra Fadnavis : राणें-खाडेंची विधाने ठरणार का फडणवीसांच्या वाटेतले काटे?

खासदार अमोल कोल्हे यांनी थोडे जपून वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा लढलो आहोत. लोकसभेत अनुकूल वातावरण नसताना सुद्धा 99 खासदार निवडून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमची निष्पक्षपणे सातत्याने कारवाई आणि चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होती. चौकशी पूर्ण होईल चार्जशीट फाईल होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका कळणार नाही. आता आरोपी अटक झाले आहेत, मात्र चार्ज शिटमध्ये काय येतं आरोपींना सुटायला मदत होईल का ? शिक्षा व्हायला मदत होईल हे कळेल आणि सरकारची भूमिका किती प्रामाणिकपणे आहे, हे दिसेल, असेही सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil
CM Devendra Fadnavis : 'मी, राऊतांसारखा रिकामटेकडा नाही', फडणवीस यांची बोचरी टीका

लाडकी बहीण योजनेबद्दल अजून सरकारची क्लियारीटी आलेली नाही. सरकारने लाडकी बहीण संदर्भात जे दोन जीआर काढले होते. त्यासंदर्भात शासन स्पष्टपणे बोलत नाही. व्यवस्थेमध्ये लेखी जीआर येत नाही तोपर्यंत आम्हाला काही कळणार नाही नेमकं सरकारची भूमिका काय आहे, असेही ते म्हणाले.

सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी पालकमंत्री मिळालेला नाही. या सरकारला घेरायला आमच्याकडे मुद्दे भरपूर आहेत. या सरकारने जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण नाही केले तर त्यांना आम्ही घेऊ मात्र मार्चपर्यंत आम्ही त्यांना वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Satej Patil
Devendra Fadnavis News : शरद पवारांचे 'संघ' कौतुक, फडणवीसांंनी दिले मोठे संकेत; म्हणाले, 'राजकारणात अशक्य...'

पालकमंत्री पदावरून त्यांच्यामध्ये काय सुरू आहे, हे माहित नाही. मात्र, त्यांच्यात घोड अडलेले आहे. काही गडबड नसते तर पालकमंत्री संदर्भात लवकर निर्णय झाला असता. कोणाला कोणते तरी जिल्हे पाहिजेत यावरून त्यांच्यात घोडे अडलेले आहे. हे संविधानिक पद आहे. ताबडतोब नेमणूक होऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी, अशी आमची भूमिका आहे. सत्तेत महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था राखणं त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Satej Patil
Ajit Pawar : "साहेबांचा नंबर झाल्यावर..." बारामती विधानसभेच्या निकालावरून अजितदादांचा शरद पवारांसह बंधू श्रीनिवास पवारांना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com