आण्णासाहेब डांगेंची घरवापसी अन् फडणवीसांनी सांगितली जुनी आठवण; प्रणिती शिंदेंनाही झापलं

Devendra Fadnavis On Praniti Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने सांगलीतील ओबीसी आणि धनगर समाज भाजपकडे वळेल असे राजकीय तज्ज्ञ म्हणताना दिसत आहेत.
Devendra Fadanvis & Praniti Shinde
Devendra Fadanvis & Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. आण्णासाहेब डांगे यांनी घरवापसी करत भाजपमध्ये प्रवेश केला, सांगलीत जोरदार सभा झाली.

  2. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी आठवण सांगत काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंवर थेट टीका केली.

  3. या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, सांगलीसह राज्यभर याची चर्चा सुरू आहे.

Mumbai News : सांगलीत भाजपने काँग्रेसपाठोपाठ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का दिला आहे. जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश करून माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना होमग्राऊंडवरच झटका दिला आहे. यामुळे आगामी स्थानिकच्या आधी भाजपला ओबीसी आणि धनगर समाजाची ताकद मिळाली आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे उपस्थित होते. (Devendra Fadnavis targeted Praniti Shinde during Anna Saheb Dange’s BJP Gharwapsi event in Sangli)

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डांगे यांच्याबाबत आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरून खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार देखील घेतला. फडणवीस यांनी, अण्णा आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आणि शिवसेना-भाजप युतीमध्ये मंत्री राहिलेले आहेत. आता पुन्हा एकदा ते आपल्या स्वगृही परतले. याचा आनंद आपल्याला होत आहे. कारण दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब ही त्यांची सतत आठवण काढत असतं. त्यांची खंत होती की आण्णा पक्ष सोडून गेले. गोपीनाथजी मुख्यमंत्री असतानाही ते कॅबिनेटच्याआधी आण्णासाहेबांबरोबर चर्चा करून मग निर्णय घ्यायचे, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis & Praniti Shinde
Sanjay Raut on Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात नवीन 'फडणवीस अ‍ॅक्ट', समज द्या अन् सोडून द्या'; राऊतांनी जळजळीत अन् झोंबणारा 'वाक्' बाण

तर आण्णांनी युतीच्या काळात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या आण्णा आणि पक्षात काही गैरसमज झाला आणि त्यांनी तडकाफडकी निर्णय घेतला. नंतरच्या काळात ते महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश गेले. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात घड्याळ हाती बांधलं. मात्र तेथे काही ते रमले नाहीत. आता ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये आले असून याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.

काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे म्हटले होते. यावरून सध्या राज्यात जोरदार टीका होताना दिसत आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील निषेध करताना जोरदार टीका केली. त्यांनी, ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा म्हणणे म्हणजे भारतीय सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे म्हटलं आहे. असे विधान करणाऱ्यांचा आपण निषेध करत असून या प्रवृत्तीचा धिक्कार करत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

प्रणिती शिंदेंनी केले विधान सेनेचा अपमान करणारं आहे. जर सेनेचा अपमान करणारे आपल्याच देशातील नेते असतील, यांच्यावर प्रश्न चिन्ह लागणे स्वाभाविक आहे. पण यांच्याबाबत कालच पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की, कदाचित बोलणारे नवीन आहेत. म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही, ते त्यांच्या मुखातून बोलून घेत आहेत. काल पंतप्रधानांनी काँग्रेसला उघडे पाडले आहे. जी भाषा पाकिस्तान बोलतोय, तीच भाषा काँग्रेस बोलत असल्याची टीका फडणवीस यांनी केलीय.

थांबायचे ते थांबतील : जयंत पाटील

दरम्यान डांगे कुटुंबाच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, माणसे फुटत असतील तर ती जाणारचं. ज्यांना जायचे ते जातील आणि ज्यांना माझ्याबरोबर थांबायचे ते थांबतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आज भाजप प्रवेश झाला.

Devendra Fadanvis & Praniti Shinde
Devendra Fadnavis Action: मुख्यमंत्र्यांचा कठोर निर्णय; 'बिअरबार'मध्ये फायलींवर सह्या करणाऱ्या सरकारी बाबूची मस्ती 'उतरवली'

FAQs :

1. अण्णासाहेब डांगे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
अण्णासाहेब डांगे यांनी घरवापसी करत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.

2. फडणवीसांनी काय विधान केलं?
फडणवीसांनी डांगे यांच्या प्रवेशावेळी एक जुनी आठवण सांगितली आणि प्रणिती शिंदेंवर थेट टीका केली.

3. याचा राजकारणावर काय परिणाम होईल?
या घरवापसीमुळे भाजपचा सांगलीतील बळ वाढणार असून काँग्रेसला धोका वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com