
थोडक्यात बातमी:
बिअरबारमध्ये सह्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल: नागपूरच्या मनीषनगरमधील बिअरबारमध्ये एक सरकारी अधिकारी फाईलवर सह्या करताना दिसल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामुळे राजकीय वातावरण तापलं.
मुख्यमंत्र्यांकडून थेट निलंबनाची कारवाई: संबंधित अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता देवानंद सोनटक्के असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले.
काँग्रेसकडून व्हिडिओ सार्वजनिक: काँग्रेसने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करून राज्य सरकारवर टीका केली, त्यानंतर तपास सुरू झाला आणि अधिकारी कोणत्या विभागातील आहे हे स्पष्ट झालं.
Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. मनीषनगर परिसरातील बिअरबारमध्ये एक अधिकारी सरकारी फाईलवर सह्या करताना या व्हिडिओत दिसून आलं होतं. आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोठी कारवाई केली आहे. त्यांनी सार्वजनिक विभागातील संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. एकीकडे राज्यात हनी ट्रॅपचे गंभीर आरोप केले जात असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रशासनात खळबळ उडाली होती. मात्र,आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई केली आहे.
नागपूर शहरातील बिअरबारमधील सीसीव्हीटी फुटेज समोर आल्यानंतर त्यातील संबंधित अधिकारी कोणत्या विभागाचा आहे अन् त्याचे नाव देखील घेतले जात नव्हते. पण या प्रकरणात काँग्रेसने यात उडी घेतली आणि सीसीटीव्ही काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ ट्वि्ट केला. यानंतर सीसीटीव्हीत सरकारी अधिकारी 'सार्वजनिक' बांधकाम विभागातील असल्याची माहिती समोर आली.
गडचिरोलीमधील चामोर्शी येथील उपअभियंता देवानंद सोनटक्के यांनी बिअर बारमध्ये सरकारी काम करत असल्याचे आणि ठेकेदाराला धरुन बिअर प्राशन केल्याची बातमी समोर आली होती. याच देवानंद सोनटक्के यांच्यावर आता थेट निलंबनाच्या कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
नागपूरमध्ये या व्हिडिओमुळे नागपूरचंच नव्हे तर संपूर्ण राज्याचं राजकारण तापलं होतं. सीसीटीव्हीत तीन व्यक्ती एका टेबलवर बसलेल्या दिसतात अन् त्यातील एक जण राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाच्या फायलींवर सह्या करताना आढळून आला होता.
टेबलवर बसलेल्या तिन्ही व्यक्ती फायलींच्या गठ्ठ्यांसमोर बसून मद्य सेवन करताना दिसत आहे. हे तिघे जवळपास तासभर गप्पा मारतात, फायलींवर सह्या झाल्यानंतर ते निघून जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांआधी या व्हिडिओची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली होती.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला या व्हिडिओबाबत चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी गोपनीय पद्धतीने सुरू होती. मात्र प्रशासनाकडून कोणीच काय बोलायला तयार होत नसल्याचं समोर आल्यानंतर थेट मंत्रालयातून सूत्रे हलली.
मात्र, नागपूरमधील बिअरबारमध्ये सुरु असलेल्या कारभाराची राज्यभरात चर्चा पाहायला मिळत आहे. बारमध्ये बसून सरकारी अधिकाऱ्याने शासकीय फाईल दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
प्र. 1: नागपूरमधील व्हायरल व्हिडिओत काय दिसलं?
उ: एका सरकारी अधिकाऱ्याने बिअरबारमध्ये सरकारी फाईलवर सह्या करत असल्याचं दृश्य सीसीटीव्हीत दिसलं.
प्र. 2: संबंधित अधिकारी कोण आहे?
उ: उपअभियंता देवानंद सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विभाग.
प्र. 3: सरकारने या प्रकरणात काय कारवाई केली?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश दिले.
प्र. 4: व्हिडिओ कसा समोर आला?
उ: काँग्रेसने सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर करून प्रकरण उजेडात आणलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.