Kolhapur BJP : महायुतीला दमदार यश मिळूनही बसणार भूकंपाचे हादरे? नाराज भाजप कार्यकर्ते मोठं पाऊल उचलणार

Kolhapur BJP Politics : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूकंपाचे संकेत देत आहेत. जुन्या नव्या वादात भाजपचे काही पदाधिकारी मोठं पाऊल उचलणार.
Kolhapur BJP
Kolhapur BJPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची अस्वस्थता कमी झालेली नाही. भाजपमधील अंतर्गत गटबाजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत समोर आल्यानंतर आता निकालानंतरही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूकंपाचे संकेत देत आहेत. जुन्या नव्या वादात भाजपचे काही पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

चौकडी राजकारणाला कंटाळून आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्षप्रवेश अटळ मानला जात आहे. स्थानिक नेतृत्वावर अनेक जणांची नाराजी आहे. तर जुना आणि नव्यावादात काही निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची फरपड होत आहे. पुढील महिन्यात काही जणांचे प्रवेश निश्चित झाले असून सत्ता असूनही भाजपला आता चिंतन करण्याची वेळ येणार आहे.

Kolhapur BJP
IAS टीना आणि रिया डाबी पुन्हा चर्चेत, काय आहे प्रकरण?

2014 पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला फारशी ओळख नव्हती. मात्र 2014 च्या लोकसभा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे चांगले दिवस आले. विधानसभा निवडणुकीत दोन आमदार भाजपने दिले. मोदी लाट आणि भाजपचा करिष्मा पाहता जिल्ह्यातील अनेक मातब्बराने काँग्रेस राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपमध्ये एन्ट्री केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची घोडदौड राहिली. 2019 च्या निवडणुकीत भाजपला एक ही जागा मिळाली नाही मात्र भाजपचा दबदबा कायम राहिला.

भाजपमध्ये (BJP) झालेल्या महाडिक गटाच्या एन्ट्रीने कोल्हापूर महानगरपालिकेत देखील भरघोस यश मिळाले. तब्बल 22 नगरसेवक निवडून आले. या 22 नगरसेवकांमध्ये केवळ दोनच भाजपचे मूळ पदाधिकारी होते. याच कार्यकाळात भाजपची सूत्रे नवख्या आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हातात गेली. त्यामुळे जुने पदाधिकारी नाराज आहेत. ते आज देखील खाजगीत नव्या पदाधिकार्‍यांच्या बद्दल नाराजी व्यक्त करताना दिसतात.

Kolhapur BJP
Gokul Dudh Mahasangh : गोकुळमध्ये भाऊबंदकीचा वाद उफाळला, नेमकं काय आहे प्रकरण?

काही ठराविक जण भाजपमध्ये आघाडीवर आहेत. पदाधिकारी निवडीमध्ये देखील हस्तक्षेप होत असल्याने मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना अनेकजण व्यक्त करतात. जुन्या पदाधिकाऱ्यांना सन्मान मिळत नसल्याची ही भावना आहे. दाद कोणाकडे मागायची? अशी विचारायची वेळ आता जुन्या पदाधिकाऱ्यांवर आले आहे. राज्यातील भाजप वरिष्ठांना देखील सांगितल्यावर न्याय मिळणार का? अशी देखील जुने पदाधिकारी भावना व्यक्त करतात.

भाजपच्या या लॉबीला कंटाळून भाजप नेते आर डी पाटील हे देखील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत गेले. तर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी देखील विधानसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा हातात घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक आणि शंभर पेक्षा अधिक मंडल स्तरावरील पदाधिकारी येत्या महिन्याभरात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com