MNS Vs Mahayuti: 'मुंबईत शिवसेनेचा एकमेव खासदार, तोही मनसेमुळेच...'; 'या' नेत्यानं वर्सोव्यात आणला मोठा ट्विस्ट

Varsova Assembly Election 2024 : मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा भावी आमदार म्हणून केकही कापण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpg
eknath shinde devendra fadnavis raj thackeray .jpgsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा केव्हाही जाहीर होतील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. मनसेनेही विधानसभा लढवण्याची तयारी सुरू आहे. अशातच वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याठिकाणी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे.हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. आता भाजपच्या मतदारसंघावर मनसेनं शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांना उतरवण्याच्या तयारीत आहे.2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या डॉ.भारती लावेकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला आहे.

एवढंच नाही तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा भावी आमदार म्हणून केकही कापण्यात आला आहे. कार्यकर्त्यांकडून वर्सोवा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आता यावर शालिनी ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या,मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा निवडून आलेला एकमेव खासदार मनसेमुळे निवडून आला.वर्सोवा मतदारसंघातील सध्याच्या महिला आमदारांबद्दल मतदारसंघात नाराजी आहे.

मनसेकडून वर्सोवा विधानसभेत उमेदवारीसाठी शालिनी ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे.शालिनी ठाकरे म्हणाल्या, कार्यकर्त्यांचं आणि मनसैनिकांचं प्रेम आहे, त्यांची जी इच्छा आहे ती ते व्यक्त करतात. शेवटी जो काही निर्णय असतो तो राजसाहेबांचा असतो.आम्हाला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाने उत्तर पश्चिममध्ये खासदार निवडून आला आहे.

भाजपच्या विद्मान आमदारांबद्दल सध्या तिथे प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे बळ वाढलं ते निवडून आले.आता कुठेतरी त्यांनी पण विचार करायचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसा न्याय मिळवून द्यायचा.वर्सोवा विधानसभा मतदारसंघाबाबत सांगायचं तर तिथे चांगला कुठलातरी चेहरा नाहीये.

या ठिकाणी जो विद्यमान महिला आमदार आहे,त्याबद्दल खूप नाराजी आहे,हे सगळे मान्य करतात.मग राजसाहेब त्या दृष्टीने विचार करत आहेत. त्यांचा जो काही आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com