Ashish Jaiswal : खासदार देशमुखांचे फेक नॅरेटिव्ह, आशिष जयस्वालांनी मागितले पुरावे

Ashish Jaiswal On MP Sanjay Deshmukh : उद्धव ठाकरे यांच्या सेनेला काही तरी कारण सांगावे लागत असून ते आता फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका शिंदे सेनेचे नेत्याने केली आहे.
Ashish Jaiswal On MP Sanjay Deshmukh
Ashish Jaiswal On MP Sanjay Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहे. ते मुख्यमंत्री असतानासुद्धा चाळीस आमदार सोडून गेले होते. याचे आत्मचिंतन उद्धव सेनेने करण्याची गरज असताना फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी जळजळीत टीका शिंदे सेनेचे नेते तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे. तसेच त्यांनी, खासदारांना पैशाचे आमिष दखवून फोडाफोडी केली जात असल्याचे वक्तव्य करणाऱ्या यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचा देखील समचार घेतला आहे. देशमुख यांचे वक्तव्य खरं असेल तर त्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हानच त्यांनी राज्यमंत्री जयस्वाल यांनी केले.

वणी येथील जाहीर सभेत संजय देशमुख यांनी उद्धव सेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, भाजप व महायुतीच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांचे वलय कमी करायचे आहे. याकरिता अनेकांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे. फोडाफोडी केली जात असल्याचा आरोप केला होता. यावर शिंदे सेनेचे नेते व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना विचारणा केली असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या सेनेला काही तरी कारण सांगावे लागत आहे.

त्यामुळे ते वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करत आहेत. सोडूण जाणाऱ्यांना रोखण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही. ते का सोडून जात आहे याची विचारण केली जात नाही. त्यावर साधे चिंतनसुद्धा केले जात नाही. कोकणापासून तर गडचिरोलीपर्यंत उद्धव सेनेत असलेले अनेकजण नाराज आहेत. शिंदे सेनेत येण्यास इच्छुक आहेत.

Ashish Jaiswal On MP Sanjay Deshmukh
Ashish Jaiswal : आशिष जयस्वालांनी CM शिंदेंनाच 'होल्ड'वर ठेवल्यानं रामटेकटचा तब्बल 'एवढ्या' कोटींची निधी रोखला?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचे आभार मानण्यासाठी विदर्भात येत आहे. त्यांची आभार सभा रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान तालुक्यात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी अनेकांचा प्रवेश होणार आहे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवायचा आहे. तसे प्रयत्न सर्वांचेच सुरू आहे. आम्ही देखील जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे.

महायुतीत असलेल्या सर्वाच पक्षांनी आपली ताकद वाढवली तर महायुती आणखी बळकट होतील. त्यामुळे नाराजी आणि आपसात मतभेद निर्माण झाले असल्याच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

Ashish Jaiswal On MP Sanjay Deshmukh
Ashish Jaiswal News : सुधीर मुनगंटीवार अतिशय संवेदनशील आणि प्रामाणिक मंत्री, पण...

आमदारांच्या सुरक्षा कपातीवरही कोणीच नाराज नाही. कोणाल किती सुरक्षा द्यायची याचा निर्णय गृह विभागाची सुरक्षा समिती करते. मागच्या काळात न्यायालयाने काही निर्देश दिले होते. त्यानुसार सुरक्षा दिली होती. काही आमदारांनी सुरक्षा नको अशी विनंती केली होती. त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले आहेत. सुरक्षेचा मूल्यमापन व गुणवत्तेवर गृह विभाग सुरक्षा देण्यासंदर्भाती निर्णय घेत असल्या जयस्वाल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com