Ashok Chavan On Budget : अशोक चव्हाण म्हणतात, हा 'अर्थसंकल्प'मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतिमान करणारा!

Ashok Chavan expresses his satisfaction with the recent budget : 12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये, एमएमएमईसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी हे तीन निर्णय मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांना बळ देणारे आहेत.
Ashok Chavan -PM Modi News
Ashok Chavan -PM Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP News : केंद्रीय अर्थसंकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत होत असतानाच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतिमान करणारा, असल्याचे म्हटले आहे. विरोधकांकडून बजेटवर टीका होत असली तरी आतापर्यंतचे सर्वात चांगले आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे हे बजेट असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी या बजेटचे कौतुक करतांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीतील संपूर्ण एनडीए सरकारचे अभिनंदन केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा आहे. देशातील सर्वच घटकांच्या विकासाला गती व गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक उत्तम निर्णय घेण्यात आले आहेत.

यामुळे रोजगार निर्मिती होईल, क्रयशक्ती वाढेल आणि देशाच्या अर्थकारणाला अधिक वेग मिळेल. या अर्थसंकल्पात ‘ज्ञान’ अर्थात गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. (Budget) देशातील सर्वात मोठा आर्थिक उत्पन्न गट असलेल्या मध्यमवर्गावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Ashok Chavan -PM Modi News
Union Budget 2025 : बजेट उघडताच शेतकऱ्यांसाठी खास घोषणा, नवी धनधान्य योजना; बिहारसाठी विशेष बोर्ड

12 लाख रुपयांपर्यंत करमुक्त उत्पन्न, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाख रुपये, एमएमएमईसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर 5 कोटी रुपयांवरून 10 कोटी हे तीन निर्णय मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांना बळ देणारे आहेत. कापूस, तूर व मसूरचे उत्पादन वाढवणे आणि डाळींच्या उत्पादनात देशाला आत्मनिर्भर करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह आहे. जीवनरक्षक व कॅन्सरवरील औषधे स्वस्त केल्याने उपचारावरील खर्च कमी होईल.

Ashok Chavan -PM Modi News
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांचे लाडके अमर राजूरकर भाजपाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्ष पदी!

लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्याच्या प्रस्तावातून इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी होतील. ‘इंडियन पोस्ट’ला एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रुपांतरीत करण्याच्या निर्णयाने देशातील या जुन्या व महत्वपूर्ण यंत्रणेला नवसंजीवनी मिळेल, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी 3.0 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिला उद्योजकांसाठीही मोठी घोषणा केली आहे.

Ashok Chavan -PM Modi News
BJP Politics : पक्की खबर! शिवसेना ठाकरेंचे सहा खासदार भाजप फोडणार

या अर्थसंकल्पात महिला वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आजच्या या अर्थसंकल्पात ( Union Budget 2025) त्यांनी सर्वसामान्याचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. यावेळी इथून पुढे आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यासह आजच्या बजेटमधून त्यांनी शेतकरी, सूक्ष्म व लघू उद्योग यासह विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com