Women Commission : अशोक खरात प्रकरणात महिला आयोग चिडीचूप, आरोप होणाऱ्या अध्यक्षही गायब?

Ashok Kharat case Rupali Chakankar : महिलांवरील अन्यायाची तत्काळ दखल घेणारा महिला आयोग अशोख खरात प्रकरणात मात्र चिडीचूप आहे.
Rupali Chakankar
Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Rupali Chakankar News: महिलांवर होणाऱ्या अन्यायाची तत्काळ दखल घेणारा आयोग अशोक खरात प्रकरणात चिडीचूप असल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अन्यायाची दखल घेत महिला आयोगाच्या ट्विटरवरून त्या प्रकरणाविषयी माहिती देत काय कारवाई झाली, काय कारवाई होणार आहे याची माहिती दिले जाते. मात्र, या प्रकरणाविषयी कोणतीही माहिती आयोगाकडून देण्यात आली नाही.

17 मार्चला आयोगाकडून शेवटचे ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये संभाजीनगरमध्ये घरी गर्भलिंग निदान करून महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेसंदर्भात माहिती देत आरोपी सासू सासरे पतीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली होती.

राज्यात अशोक खरात प्रकरणाची चर्चा आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या भोंदूबाबावर कारवाई व्हावी, म्हणून मागणी केली जात आहे. मात्र, खरात हा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा गुरु असल्याने त्याच्या विरोधात अजून आयोगाकडून कारवाई केली जात नसल्याचे देखील चर्चा सोशल मीडियात आहेत.

Rupali Chakankar
Rupali Chakankar Resign Demand: 'एका बलात्काऱ्याच्या घरी रांगोळी,तर दुसऱ्याचं...'; चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आणखी एका महिला नेत्यानं उचललं मोठं पाऊल

रुपाली चाकणकर अडचणीत?

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर रुपाली चाकणकर यांच्याकडून देखील कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी या दोन दिवसांत या प्रकरणात कारवाईचे संकेत दिले आहेत.

Rupali Chakankar
Maharashtra Politics : 'महाराष्ट्रातील फडणवीसांचे सरकार कोसळेल, 'त्या' व्हिडिओमध्ये...', ठाकरेंच्या खासदाराचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com