Ashok Kharat expose : मोठा खुलासा! जगासमोर आज येणार अशोक खरातचा विकृत चेहरा; तेजस्वी सातपुते उलगडणार मोठे गुपित!

Tejasvi Satapute press statement today : अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा होणार असून तेजस्वी सातपुते आज धक्कादायक गुपित उघड करणार आहेत. संपूर्ण बातमी जाणून घ्या.
Ashok kharat IPS Tejaswi Satpute
Ashok kharat IPS Tejaswi SatputeSarkarnama
Published on
Updated on

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, खरातचा खरा आणि धक्कादायक चेहरा आज उघड होण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान स्वतः अशोक खरातने केलेल्या कबुलीजबाबामुळे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

महिलांना कशा प्रकारे फसवलं जात होतं, त्यांना मानसिकदृष्ट्या कसं जखडून ठेवलं जात होतं, तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी त्यांना कसं तयार केलं जात होतं, याबाबत गंभीर माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

Ashok kharat IPS Tejaswi Satpute
BJP leader Death : स्थापना दिनीच भाजपवर शोककळा; दिग्गज नेता काळाच्या पडद्याआड, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी

या संपूर्ण प्रकरणावर आज सायंकाळी 5 वाजता विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वि सातपुते पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत तपासातील महत्त्वाचे मुद्दे, पुरावे आणि नव्याने समोर आलेले खुलासे सविस्तर मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे.

अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे नोंदवले गेले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधूनही काही महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत, ज्यातून महिलांना कसं जाळ्यात ओढलं जात होतं याचा उलगडा झाला आहे.

Ashok kharat IPS Tejaswi Satpute
Ashok Kharat Scam : समता पतसंस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; अशोक खरात याच्या खात्याप्रकरणी गुन्हा दाखल, परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश

तसेच, खरातने स्वतः कबूल केलं आहे की तो महिलांशी आधी विश्वासाचं नातं निर्माण करायचा आणि नंतर त्याचा गैरफायदा घ्यायचा. या पद्धतीने अनेक महिलांना फसवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे या प्रकरणाने समाजात मोठी खळबळ उडाली आहे.

आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत तेजस्वि सातपुते नेमकी कोणती माहिती उघड करणार, कोणते नवे पुरावे सादर होणार आणि या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या खुलास्यांनंतर या प्रकरणात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com