Ashok Kharat Case: रायगड जिल्ह्यात अशोक खरातची जमीन; मुलीच्या नावे केला तब्बल कोटभर रुपयांचा व्यवहार

Ashok Kharat Land Deal in Raigad: उत्तर महाराष्ट्रात खरात याने अनेक ठिकाणी जमीनचे व्यवहार केले आहे. त्यानंतर आता त्याने कोकणातही बेहिशेबी मालमत्ता घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat case news update
Ashok Kharat case news update Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Land Deal News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या मालमत्तेबाबत माहिती घेतली जात असल्याचे सभागृहात सांगितले.

खरात याच्या मालमत्तेचा माहिती एसआयटीचे पथक घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात खरात याने अनेक ठिकाणी जमीनचे व्यवहार केले आहे. त्यानंतर आता त्याने कोकणातही बेहिशेबी मालमत्ता घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

खरातच्या मालमत्तेबाबत अतिरिक्त माहिती घेतली जात आहे. काही वरिष्ठ अधिकारी जर यात सहभागी असतील तर माहिती घेऊन चौकशी केली जात आहे. त्यांच्या संस्थानची आणि संस्थेवरील संचालकांची चौकशी केली जात आहे. खरातच्या सोबतच्या सर्वांचे जवाब नोंदवले जात आहेत, असे फडणवीस यांनी काल सभागृहात सांगितले होते.

Ashok Kharat case news update
Ashok Kharat Case: अशोक खरातचा पाय आणखी खोलात; सातवा गुन्हा दाखल, कोणी केली होती तक्रार

व्हिडीओ देणाऱ्या सर्वांचे जवाब नोंदवण्यात आले आहे. एसआयटी तपासातून पीडित महिलांची चौकशी केली आहे. 4 पीडित महिलांचे जवाब नोंदवून गुन्हे नोंद करण्यात आले असून खरातवर आतापर्यंत एकूण 5 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - अशोक खरातला ज्यांनी मदत केली असेल त्यांची चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.

Ashok Kharat case news update
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी प्रशासकीय कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

रायगड जिल्ह्यात अशोक खरातची मुलीच्या नावे जमीन खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.उत्तर महाराष्ट्रातील खरात कोकणातील जमीन खरेदी करतो. याचा अर्थ खरातचे रायगड जिल्ह्यात येणेजाणे व्हायचे, हे उघड झाले आहे.

खरात प्रकरणामुळे सनदी अधिकारी अभिजीत भांडे अडचणीत आले आहे. त्यांची बदली करण्यात आली आहे. अभिजीत भांडे आणि अशोक खरात आणि यांच्यात काही व्यवहार झाल्याचे धागेदोरे एसआयटी तपासात समोर येत आहे.

नाशिकच्या पाथर्डी शिवारातील 40 गुंठे जागेत अभिजीत भांडे-पाटील यांच्या पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मुलीचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. या सातबारावर प्रिती भांडे आणि तृप्तबाला खरात यांची नावे दिसत आहेत. शासनाने अभिजित भांडे यांची प्रतिनियुक्ती काढून घेतली आहे. त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com