Attack Shirish Chaudhary House : उपनगराध्यक्ष निवडीनंतर घमासान, माजी आमदाराच्या घरावर हल्ला; पोलिसांचा जागता पहारा

Shisena Shirish Chaudhary Police : नंदूरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर किरकोळ वाद झाला. या वादानंतर मध्यरात्री माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला केला.
Shirish Chaudhary Eknath Shinde
Shirish Chaudhary Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : एकनाथ शिंदेंचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदूरबार नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी चौधरी यांचा मुलगा प्रथमेश याची निवड झाली. या निवडीनंतर दुपारी किरकोळ वाद झाला होता.

दुपारी झालेल्या किरकोळ वादाचे रात्री हिंसक हल्ल्यात रुपांतर झाले. रात्री अचनाक माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात जमावाने भीषण हल्ला केला. या दगडफेकीत चौधरी यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले असून हल्लेखोरांनी उभ्या गाड्या पेटवून देण्याचाही प्रयत्न केला.

या घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश चौधरी यांनी उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 30 मतांनी विजय मिळवला आहे.

Shirish Chaudhary Eknath Shinde
PMC Election : पुण्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील 'मविआ'तील मित्र पक्ष आमने-सामने; सपकाळांच्या 'त्या' आदेशामुळे काँग्रेसचे 2 उमेदवार ठरले बंडखोर

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी उपनगराध्यक्ष हाजी परवेझ खान यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून निवडणुकीत पाच मुस्लिम बहुल जागांवर दिलेल्या मुस्लिम उमेदवारांचा पराभव झाला. आणि एमआयएमचे उमेवार विजयी झाले होते. त्यामुळे मुस्लिम चेहरा म्हणून शिवसेनेकडून परवेझ खान यांना संधी दिल्याची चर्चा आहे.

Shirish Chaudhary Eknath Shinde
RJD internal conflict : 'यादवी' पुन्हा उफाळली, लालुजींच्या कन्या रोहिणी आचार्य पुन्हा 'घरचा आहेर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com