PMC Election : पुण्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात देखील 'मविआ'तील मित्र पक्ष आमने-सामने; सपकाळांच्या 'त्या' आदेशामुळे काँग्रेसचे 2 उमेदवार ठरले बंडखोर

Pune Mahavikas Aghadi Conflict : राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांच्या दोन कार्यकर्त्यांनी पक्षाकडून अर्ज दाखल केले होते, तसेच अर्ज माघारीच्या दिवशी या उमेदवारांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने चित्र निर्माण झाले होते.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan Sapkalsarkarnama
Published on
Updated on

Pune News, 11 Jan : महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित निवडणूक लढवत आहेत. असं असतानाही काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म मोडत एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत.

प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असतानाही या वादावर तोडगा न निघाल्याने आता थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आदेश काढलेत. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये काँग्रेसकडून तीन, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांच्या दोन कार्यकर्त्यांनी पक्षाकडून अर्ज दाखल केले होते, तसेच अर्ज माघारीच्या दिवशी या उमेदवारांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने चित्र निर्माण झाले होते.

Harshvardhan Sapkal
PMC Election : 'आम्ही सत्तेत असताना कोयता गँग नव्हती, त्रिमूर्तींनी पुण्याची वाट लावली'; अजितदादांचा भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल

परंतु, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात येथील चार जागा ठाकरेंच्या सेनेला आणि एक जागा काँग्रेसला असे ठरले होते. मात्र, काँग्रेसकडून तीन अर्ज दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरु होती. आघाडी धर्म पाळून एकाच जागेवर काँग्रेसने उमेदवारी निश्चित करण्याची मागणी सातत्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुरु होती.

Harshvardhan Sapkal
UP model elections : महाराष्ट्रात ‘बिनविरोध’साठी भाजपचं ‘यूपी’ मॉडेल! 'आप'चे संजय सिंह यांचा घणाघात

हा पेच सोडवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच थेट आदेश दिले आहेत. त्यानुसार शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ३८-अ गटातून उभ्या असलेल्या अस्मिता भूषण रानभरे याच एकमेव अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे अन्य दोन्ही उमेदवार बंडखोर असल्याचे निष्पन्न झाले असून प्रभाग ३८ मधील अस्मिता रणभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे व वसंत मोरे हे महाविकास आघाडीचे आता अधिकृत उमेदवार असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com