मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते अभिजीत पानसे (Abhijit Panase) यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (uday Samanat) आणि वरूण सरदेसाई (Varun sardesai) यांची भेट घेतली होती. या भेटीचा एक फोटो देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या भेटीनंतर पानसे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या भेटीवर मनसेचे दुसरे मोठे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मोठा खुलासा केला आहे. हि भेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानेच झाली असल्याचे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
अविनाश जाधव म्हणाले, अभिजीत पानसे-उदय सामंत यांच्या भेटीचा फोटो खरा आहे. पण त्या फोटो मागचे आणि भेटीमागचे कारण म्हणजे, येत्या १९ तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे मनसेची शिक्षण परिषद होणार आहे. याच परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून अभिजीत पानसे यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत आणि वरूण सरदेसाई यांची भेट घेतली होती. या परिषदेचे आमंत्रण राज ठाकरे यांनाही असून यात अनेक शिक्षण तज्ञही सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
अविनाश जाधव पुढे बोलताना म्हणाले, अभिजीत पानसे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे कट्टर भक्त आहेत. ते पुढे गेले की मागे वळून पाहत नाहीत. ते पुन्हा कधीही शिवसेनेच्या दाराशी जाणार नाहीत. तसेच मनसेत प्रत्येक जण गद्दार नसतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष रित्या पक्षाला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांना टोला लगावला.
तसेच राज ठाकरे यांच्याकडे लाखो तरुण आहेत, जे स्वतःच्या रक्तामध्ये त्यांना ठेवतात. आमच्या रक्तात राज ठाकरे आहेत आणि राहणार, आणि असा कोणीही नाही जो आमच्या रक्तातून राज ठाकरे यांना काढू शकेल. आम्हाला कोणतीही मोठी अपेक्षा नाही, केवळ राज ठाकरे यांच्या सोबत राहून समाजाची सेवा करायची आहे. त्यामुळे अभिजीत पानसे यांच्याविषयी कोणीही अफवा पसरवू नये अशी विनंतीही जाधव यांनी केली.
पुण्यात मनसेच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी दोन दिवसांपुर्वीच मनसेला राम राम केला होता. त्यानंतर लगेचच अभिजीत पानसे यांनीही मंत्री सामंत यांची भेट घेतल्याने ते देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सामंत यांच्याही म्हणण्यानुसार पानसे आपल्याला वेगळ्या कामासाठी भेटले होते. अभिजित यांचे वडिल रमेश पानसे हे शिक्षणक्षेत्रात काम करतात. त्यासंबंधी अभिजित भेटायला आल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.