
बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका करत ६ लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त केला.
त्यांनी विचारलं, “२८ लोकांसाठी सिंदूर यात्रा झाली, पण सहा लाख विधवांच्या सिंदूराबाबत सरकार गप्प का?”
त्यांच्या विधानामुळे सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून विरोधी पक्षांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या.
Pune News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये मोठी कारवाई केली. ज्यानंतर भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. पण ऐनवेळी सरकारने माघार घेत युद्धबंदी केली. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आताही केंद्रीय अधिवेशनात हा मुद्दा चांगला तापला असून विरोधकांनी सरकारला निशान्यावर घेतलं आहे. यादरम्यान प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. त्यांनी ज्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 पर्यटकांची हत्या केली. त्यांच्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले. पण याच केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला मात्र 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत. यावर सरकार चर्चा देखील करायला तयार नाही. भाजपला फक्त देवी-देवतांचे नाव वापरायचे आहे. त्यांना लोकांना फक्त धर्मामध्ये गुंतून ठेवायचं आहे. त्यांनी आज परिस्थिती अशी निर्माण केलीय की महादेवाचा त्रिशूल शेतकऱ्याच्या छाताड्यात खूपसायचा बाकी आहे, अशी टीका त्यांनी केलीय.
लोकसभेत पावसाळी अधिवेशनात कालपासून पुलवामा, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून चर्चा सुरू आहे. या विशेष चर्चादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. विशेषत: भारताना पाकव्याप्त काश्मीर घेण्याची संधी असताना कोणासाठी भारताने माघार घेतली, असा सवाल विरोधक करताना दिसत आहेत. अशातच बच्चू कडू यांनी राज्य सरकार आणि मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.
कडू यांनी, सहा लाख हिंदू आया बहिणींच सिंदूर उधळलं गेलं, पण मोदीजी असोत की फडणवीस हे बोलायला तयार नाही. ते साधी श्रद्धांजलीही द्यायला तयार नाही. देशातील 26 पर्यटकांचा जीव ज्या दहशतवाद्यांनी घेतला. त्यांचा खात्मा आमच्या सैन्याने केला. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. जी अभिमानाची बाब आहे. यानंतर राज्यात आणि देशात सिंदूर यात्रा काढल्या गेल्या. मात्र सहा लाख शेतकरी यांनी पाय घासून घासून आत्महत्या केली, त्यांची आठवन देखील आपलं सरकार काढत नाही. त्या आया बहिणींचा सिंदूर तुम्हाला आठवत नाही. ते तुम्हाला दिसत नाही असा हल्लाबोल कडू यांनी केला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला थेट विरोधक असणाऱ्या अमित शाह यांनी फोन केला, यावरूनही कडू यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपला सगळं व्यवस्थित कसे ठेवायचे हे कळतं. हीच त्यांची खेळी आणि रनणीती आहे. तर भविष्यात नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांनीही हालचाल करू नये म्हणून योग्य काळजी भाजपने घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भविष्यात नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांनी हालचाल केल्यास त्यांचे पर्याय आपल्यापाशी असल्याचा भास भाजप निर्माण करत आहे. तुम्ही बाजूला झाल्यास आमच्याकडे उद्धव ठाकरे व शरद पवार आहेत असा ते संदेश देत आहेत. पण हे दोघेही भाजपला पाठिंबा देतील असं वाटतं नाही, असेही कडू यांनी म्हटलं आहे.
प्रश्न 1: बच्चू कडू यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल नेमकं काय म्हटलं?
उत्तर: त्यांनी सांगितले की २८ लोकांसाठी सिंदूर यात्रा केली जाते, पण ६ लाख शेतकरी आत्महत्यांचे सिंदूर कोणालाही दिसत नाहीत.
प्रश्न 2: बच्चू कडू यांचे आरोप कोणावर होते?
उत्तर: त्यांचे थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होते.
प्रश्न 3: त्यांच्या या विधानामुळे काय प्रतिक्रिया उमटल्या?
उत्तर: विधानानंतर विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला असून सोशल मीडियावरही हा मुद्दा गाजत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.