Bacchu Kadu News : विधान परिषदेची उमेदवारी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिळाली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली असून बच्चू कडून यांची आमदार म्हणून घोषणा होणे ही केवळ औपचारिकता राहिली आहे. दरम्यान, आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी 'सकाळ'ला दीर्घ मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आपण पुन्हा आमदार होणार असल्याच्या बातम्या टिव्हीवर येत असताना आपली पत्नी अस्वस्थ झाली होती, अशी कबुली दिली.
बच्चू कडू म्हणाले, पराभव झाल्यामुळे माझ्या पत्नीला वाटले, की आता पाच वर्षे कटकट नाही. मीदेखील आंदोलन आणि शेतीच्या कामाला लागलो. मी अलीकडेच केळीची लागवड केली आणि गायीचे दूध काढणे शिकत होतो; मात्र अचानक टीव्हीवरील बातम्या पाहून माझी पत्नी अस्वस्थ झाली.
कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मी स्वतःसाठी काहीच मागितले नाही आणि पुढेही मागणार नाही. दिवंगत आर. आर. पाटील यांनीदेखील मला राज्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती; मात्र मी स्वीकारली नाही. मंत्रिपद मिळो वा न मिळो, मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या सभागृहात वंचित, शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्या मांडणार आणि त्यांना न्याय मिळवून देणार आहे.
प्रहारचे शिवसेनेत विलीन होणार का? याबाबत बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी माझ्या मुद्द्यांवर काम केले जाईल आणि माझ्या पद्धतीने काम केले जाईल, असे मी एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यांनी ते मान्य केले. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला हे माझ्या कामाचे क्षेत्र आहे. दुसरे म्हणजे प्रहार संघटना सुरू ठेवण्याची विनंती त्यांना केली होती, त्यामुळे ही संघटना सामाजिक काम करत राहील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.