Bacchu Kadu : भाजपत प्रवेश का केला नाही?: बच्चू कडूंनी एका वाक्यात विषय संपवला; एकनाथ शिंदे मध्यरात्री दार उघडणारा माणूस...

Shivsena Joining Story : बच्चू कडू यांनी भाजपशी मतभेद असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे शिवसेनेत प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चा रंगली आहे.
Bacchu kadu-Eknath Shinde
Bacchu kadu-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Raigad, 01 May : भारतीय जनता पक्षाचं आणि आमचं पटलं नसतं. कारण, मी त्या ठिकाणी ‘मॅच’च होत नाही. एकनाथ शिंदे आणि मी मॅच होतोय, त्यांच्या ठिकाणी सेवाभावी वृत्ती आहे. मध्यरात्री दार उघडणारा हा माणूस आहे. एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दानतत्व आहे, अशा शब्दांत माजी आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना प्रवेशामागचं गुपित उलगडलं आहे.

बच्चू कडू यांना शिवसेनेतच प्रवेश का केला? भाजपमध्ये का नाही? या प्रश्नावर उत्तर देताना भाजमध्ये आपलं पटलं नसतं, हे स्पष्ट करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दातृत्वाचे कौतुक केले आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, त्यामुळे आम्ही त्यांचे चाहते झालो. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये मोठा हिस्सा एकनाथ शिंदे यांचा होता, ही अंदर की बात है. कर्जमाफीसाठी त्यांनी मोठा प्रयत्न केलेला आहे.

एकमेकांचे विचार जुळले तर मतं जुळतात. विचारच जुळले नाही तर मनं जुळण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांना म्हटलं की, पदं हा विषय महत्वाचा नाही. मुद्दे महत्वाचे आहेत आणि मुद्दे घेऊन आपण पुढे गेले पाहिजे, असेही बच्चू कडू यांनी नमूद केले.

Bacchu kadu-Eknath Shinde
Satara ZP : सातारचे SP तुषार दोशींची बदली का केली? एकनाथ शिंदेंचं नाव घेत फडणवीस म्हणाले,‘पनीशमेंट म्हणून...'

शेतकरी संवाद यात्रा काढणार

माजी मंत्री कडू म्हणाले, शेतकरी संवाद यात्रा काढण्याची माझी संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट झाली तर त्यांना ही गोष्ट मी सांगणार आहे. वेगवेगळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसोबत कशा पद्धतीने संवाद साधता येईल, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन आता लढणारी शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, खचून जाऊ नका, असा संदेश देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या शेतकरी संवाद यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होऊन संवाद साधावा, अशी विनंती मी त्यांना करणार आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

Bacchu kadu-Eknath Shinde
Satara NCP : साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; औंधच्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी लवकरच भाजपत प्रवेश करणार

...म्हणून छत्रपतींच्या पायी माथा टेकण्यासाठी रायगडावर आलो

स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यानं केलं आहे. त्याचं स्मरण राहावं, सर्वसामान्यांच्या प्रती असलेली अस्था आमच्या डोक्यातून कुठेही जाऊ नये, यासाठी छत्रपतींच्या पायी माथा टेकण्यासाठी रायगडावर आलो आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रती कशी चांगली होत राहील, यासाठी नवा संकल्पही करण्यासाठी येथे आलो आहे, असे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com