Bacchu Kadu Setback : बच्चू कडूंना मोठा धक्का! कोर्टाने अध्यक्षपदावर राहण्याचा दावा फेटाळला

Bacchu Kadu Court Amravati Bank : ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. तरीसुद्धा, नवीन निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत आम्हालाच पदावर राहू द्यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, कोर्टाच्या निकालाने चित्र पालटले आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on: 
Updated on: 

Bacchu Kadu News : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरून माजी राज्यमंत्री तथा बँकेचे माजी अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे. न्यायलयाने 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर पदावर राहण्याचा हक्क फेटाळला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. तरीसुद्धा, नवीन निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत आम्हालाच पदावर राहू द्यावे,असा दावा बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात केला होता. मात्र, मुदत संपली की पद सोडणे भागच, हा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

गेल्यावर्षी बच्चू कडू यांना एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर बँकेच्या अध्यक्षपदावर अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, मुंबई हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यामुळे ते अध्यक्षापदवार कायम राहिले होते. मात्र, संचालक मंडळाची मुदत संपल्याने पुन्हा निवडणूक जाहीर होईपर्यंत पदावर कायम ठेवावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, न्यायलयाने त्याला नकार दिला आहे.

Bachchu Kadu
Farmer Crisis : दिशा सालियन प्रकरणावर प्रश्न; बच्चू कडू म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला!’

शिक्षक मतदारसंघात चुरस

अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघ निडणुकीची चुरस आहे. दरम्यान, नुकतीच शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली, या बैठकमधील बच्चू कडू यांचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की, आपली विश्वासू माणसे कामाला लागली आहेत. सर्वांपर्यंत 'प्रसाद' व्यवस्थित पोहोचला आहे. बच्चू कडू यांनी उल्लेख केलेला 'प्रसाद' या शब्दाचा नेमका अर्थ काय, यावरून विरोधकांनी टिका केली आहे.

Bachchu Kadu
Shiv Sena Bow Arrow Symbol : धनुष्यबाण गोठणार? सुप्रीम कोर्टाच्या सवालानंतर बच्चू कडू म्हणाले, ‘काहीही होणार नाही’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com