Bachchu Kadu News: बच्चू कडूंचा आजवरचा सर्वात धक्कादायक आरोप; म्हणाले,'उद्धव ठाकरेंनी मला फसवलं,कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी...'

Maharashtra Politics : माजी मंत्री व प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यावरुनच उद्धव ठाकरेंनी कडूंवर हल्लाबोल केला होता.आता ठाकरेंच्या याच टीकेला बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Bachchu kadu Uddhav thackeray .jpg
Bachchu kadu Uddhav thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. यात विधानसभा निवडणुकीपासून महायुतीवर टीकेची झोड उठवणारे माजी मंत्री व प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यावरुनच उद्धव ठाकरेंनी कडूंवर हल्लाबोल केला होता.आता ठाकरेंच्या याच टीकेला बच्चू कडूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून आयोजित रोगनिदान शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केली. तसेच उद्धव ठाकरेंच्या टीकेवरही पलटवार केला.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी बच्चू कडूंवर टीकेची झोड उठवली होती. त्यांनी यावेळी आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता,घरी बोलवून त्याला मंत्री केला, ही माझी मोठी चूक झाली असं म्हटलं होतं.पण जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद असल्याचा दावा ठाकरेंनी केला होता.

बच्चू कडू यांनी आता उद्धव ठाकरेंच्या याच टीकेवर जशास तसा पलटवार करताना गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. त्यावेळी त्यांनी माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

Bachchu kadu Uddhav thackeray .jpg
BJP News: एकहाती पालिकेची सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर नवं टेन्शन; पुण्यात 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'ची जोरदार चर्चा; कारणही आलं समोर

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी मला मंत्री केलं. त्यांनी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता,संख्याबळासाठी ठाकरेंनी आम्हाला गळ घातली होती. उद्धव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिलं नाही, त्यांनी माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. शिवसेना फुटल्याचं खापर माझ्यावर फोडू नका,असाही इशारा कडू यांनी ठाकरेंना दिला.

तसेच उद्धव ठाकरे जे काही माझ्याबद्दल बोलले, ते मनापासून बोलल्यासारखं वाटत नाही. पण आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं, मग ती आम्ही चूक केली, असा सवालही बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी मोठा गौप्यस्फोट करताना गुवाहाटीला जातानाही ठाकरेंना विचारल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदेंनीच ठाकरेंसोबत माझी भेट घालून दिल्याचंही कडू यांनी यावेळी म्हटलं.

Bachchu kadu Uddhav thackeray .jpg
Chhagan Bhujbal News: आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीबाबत भुजबळांचा दावा चुकला; डिझेल टंचाईमुळे शेकडो ट्रक अडकले

आमच्या मतांमुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले,उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता,संख्याबळासाठी त्यांनी आम्हाला गळ घातली होती असा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला.

ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून मला मंत्री केलं.उद्धव ठाकरेंनी दिव्यांग मंत्रालय दिलं नाही, त्यांनी माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. शिवसेना फुटल्याचं खापर माझ्यावर फोडू नका, असंही यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे माझ्याबद्दल जे काही बोलले ते मनापासून बोलले असं वाटत नाही. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, मग आम्ही चूक केली असं म्हणायचं का असा उपरोधिक टोलाही कडू यांनी यावेळी ठाकरेंना लगावला.

Bachchu kadu Uddhav thackeray .jpg
MahaYuti seat sharing : विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा तिढा 'त्या' एका जागेवरून आडला; एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत नेमके काय घडले?

यावेळी बच्चू कडू यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तुम्ही नेमका का प्रवेश केला असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बच्चू कडू म्हणाले,मला जावं वाटलं म्हणून मी गेलो.शिंदे साहेब,इतरांपेक्षा अधिक मजबूत आहे,सेवाधारी माणूस आहे. कधीही धावून जाणारे आणि कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहणारे नेते असल्याने त्यांच्यासोबत गेलो असल्याचे सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com