

Bachchu Kadu News : सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाबाबत सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल हे ठाकरेंची बाजु मांडत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णायवर प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, पक्ष आणि चिन्ह शिंदेंकडेच राहणार असल्याचा काॅन्फिडन्स आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
कडू म्हणाले,'धनुष्यबाण पेलण्याची ताकद एकट्या एकनाथ शिंदेंसाहेबांकडे आहे. कोर्टालाही हे माहिती आहे की, यांच्याशिवाय कोणी पेलू शकत नाही. शेवटी कोर्ट देखील शिंदेसाहेबांच्या बाजुने निकाल देईल.'
शिवसेनेची 2018 ची घटना अवैध ठरवून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. मात्र, यावर आक्षेप घेत ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याची सुनावणी सुरू आहे. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची बाजु मांडताना पक्ष कोणाचा हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा नसल्याचे म्हटले.
विधीमंडळातील सर्वाधिक आमदारांचा पाठींबा एकनाथ शिंदेना आहे. त्याआधारे निवडणूक आयोगाने निकाल दिला होता. त्याबाबत विधीमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळे नाहीत. ते एकच आहेत. त्यामुळे केवळ विधीमंडळातील बहुमताच्या आधारे निर्णय चुकीचे असल्याचा दावा अॅड. सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.