Nashik Potholes : ठाकरेंनी मोर्चाची घोषणा करताच भाजपसह महापालिका लागली कामाला; CM फडणवीसांची बैठक, तर आयुक्तांनी 36 अधिकाऱ्यांना धाडल्या नोटीस!

Nashik officers notice over potholes: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेणार आहेत. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळा मंत्र्यांसह महापौर देखील रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आता महापालिका आयुक्त ही जाग्या झाल्या आहेत.
Nashik Potholes | Fadnavis Review | Civic Action
Nashik Potholes | Fadnavis Review | Civic ActionSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 12 Aug : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे हा आता प्राधान्याचा विषय बनला आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यावर सक्रिय झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने ही मरगळ झटकून रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेणार आहेत.

यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. कुंभमेळा मंत्र्यांसह महापौर देखील रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. आता महापालिका आयुक्त ही जाग्या झाल्या आहेत. त्यांनी तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन या प्रश्नावर आढावा घेतला. सर्व खड्डे बुजविण्याची मोहीम उघडण्यात आली आहे.

या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन आयुक्तांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावरच नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा फटका वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसला आहे. मंगळवारी आयुक्तांनी केलेल्या कारवाईने अधिकाऱ्यांची झोप उडाली.

विशेष म्हणजे थेट शहर अभियंता संजय अग्रवाल यांना त्यात दोषी धरण्यात आले आहे. शहर अभियंत्यांसह पाच कार्यकारी अभियंते आणि 26 उपअभियत्यांना आयुक्तांनी नोटीस बजावली. खड्ड्यांच्या प्रश्नांवर तातडीने खुलासा मागितला आहे.

Nashik Potholes | Fadnavis Review | Civic Action
Raj Thackeray Meets Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ठाकरे थेट CM फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

विशेष म्हणजे पाणीपुरवठा विभागाच्या आणि सार्वजनिक विभागाचे काम बघणाऱ्या अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावरही आयुक्तांची नाराजी प्रकटली. धारणकर यांना काल नोटीस बजावण्यात आली. तीन दिवसात खुलासा मागितला. त्यात समाधान न झाल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. याबाबत राज्य शासनाला देखील अहवाल पाठविण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Nashik Potholes | Fadnavis Review | Civic Action
Ghatkopar Landslide : मुंबईत मोठी दुर्घटना! घाटकोपरमधील चाळीवर दरड कोसळली; दोघांचा मृत्यू तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

शहरातील सर्व रस्ते आणि चौकांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. खड्ड्यांमुळे शंभरहून अधिक नागरिक जायबंदी झाले. या अपघातांमध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याची प्रतिक्रिया महासभेत उमटली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने येत्या 17 ऑगस्टला या प्रश्नावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. महापौर, पालिका आयुक्त आणि थेट कुंभमेळा मंत्र्यांना घेरण्यासाठी हा मोर्चा खासदार संजय राऊत काढणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com