
Maharashtra Politics : कराडमधील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनेलचा पराभव केला. त्यानंतर पाटलांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आमदारांना टार्गेट केले आहे.
आमदार घोरपडे यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाल्यानंतर खडसे यांनी ट्विट करत म्हटले होती की, ‘4 महिन्यापूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या 'सहयाद्री कारखाना' निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील...’
रोहिणी खडसेंच्या ट्विटवर आमदार घोरपडेंनी लगेच पलटवार केला. रोहिणीताईंना सहकारतला काही कळत नाही, असे घोरपडे म्हणाले. त्यांचा हा टोला खडसेंच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यांनी आज पुन्हा ट्विटरवर पोस्ट करत घोरपडेंवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसेंनी म्हटले आहे की, छान! काय आहे ना, आपली संख्या जास्त असली, आपले बहुमत जास्त असले तर लोकांना आपणच श्रेष्ठ आहोत असे वाटतं, त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना काही कळतच नाही, असा त्यांचा भ्रम असतो. 100 वर्षांपूर्वी काही लोकांना असंच वाटायचं पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी असा काही आसूड ओढला की सर्व भ्रम मोडीत काढले.
राहिला प्रश्न आमदार घोरपडे यांच्या वक्तव्याचा तर त्यांच्या वक्तव्यातून त्यांची पुरुषी मानसिकता दिसते. याच मानसिकतेविरोधात महात्मा फुले आणि सावित्रीमाई लढल्या आणि आम्हा स्त्रियांना ‘गुलामगिरी’तून मुक्त केले होते. ज्योतिबा फुले आज विचाररुपी आमच्यात जिवंत आहेत, हे घोरपडेंसारख्या लोकांनी विसरू नये, असे खडसेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.