IPS Sadanand Date : कसाबला भिडणारे सदानंद दाते आता राणालाही चढवणार फासावर

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे एनआयएचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यावेळी ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते.
Sadanand Date, known for bravely confronting Ajmal Kasab during the 26/11 Mumbai attacks, now leads India’s NIA
Sadanand Date, known for bravely confronting Ajmal Kasab during the 26/11 Mumbai attacks, now leads India’s NIASarkarnama
Published on
Updated on

Mumbai terror Attack : मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडून राणाला फासावर लटकवण्यासाठी विशेष कोर्टात प्रयत्न केले जाणार आहेत. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक योगायोग समोर आला आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे एनआयएचे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यावेळी ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कामा रुग्णालयात ते दहशतवाद्यांशी भिडले होते. अजमल कसाब आणि अबू इस्माइल हे दोघे रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न करत होते. दाते आणि त्यांचे टीमने त्यांना रोखत अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला होता.

Sadanand Date, known for bravely confronting Ajmal Kasab during the 26/11 Mumbai attacks, now leads India’s NIA
Tahawwur Rana: मुंबई हल्ल्यात 160 जणांचा जीव घेणाऱ्या तहव्वूर राणाला कुठल्या जेलमध्ये ठेवणार? बराकीत कोण असणार साथीदार...

राणा यानेच मुंबईवरील हल्ल्यासाठी संपूर्ण परिसराची रेकी केली होती. तो या हल्ल्यामागचा मास्टरमाईंड मानला जातो. त्यामुळे त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी दाते प्रमुख असलेल्या एनआयएने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तपास यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी त्यासाठी अमेरिकेत तळ ठोकून होते.

अमेरिकेतून राणाला भारतात आणण्यात मोठे यश मिळाल्याने आता दाते यांना त्याला फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. देशाचा शत्रू असलेल्या राणाविरोधात एनआयएने अनेक महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्याआधारेच त्याला अमेरिकेतील कोर्टाने भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. याच एनआयए नेतृत्व दाते यांच्याकडे आहे.

Sadanand Date, known for bravely confronting Ajmal Kasab during the 26/11 Mumbai attacks, now leads India’s NIA
Tahawwur Rana Extradition : तहव्वूर राणाचा 'तो' प्लॅन ठरला मुंबईसाठी घातक, डेविड हेडलीला भारतात कसं पाठवलं? जाणून घ्या

मुंबईवरील हल्ल्यानंतरच एनआयएची स्थापना झाली आहे. दहशतवादी प्रकरणांचा तपास या यंत्रणेकडे असतो. 1990 च्या तुकडीचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेल्या सदानंद दाते मार्च 2004 मध्ये एनआयएचे प्रमुख बनले आहेत. ते डिसेंबर 2026 मध्ये निवृत्त होतील. एनआयएचे प्रमुख होण्याआधी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख होते.

दाते एनआयएतून निवृत्त होण्याआधी राणाला शिक्षा झाल्यास ही त्यांच्यासाठी मोठी घटना ठरणार आहे. कामा रुग्णालयात दहशतवाद्यांचा सामना करताना त्यांचे दोन सहकारी शहीद झाले होते. त्यांनाही ग्रेनेड हल्ल्यात गंभीर दुखापत झाली होती. मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱीही मुंबई हल्ल्यात शहीद झाले होते. त्यामुळे राणाचा खटला दाते यांच्यासाठी महत्वाचा असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com