Satish Bhosle bail : बीडचा ‘खोक्या’ भाई पुन्हा चर्चेत ! जामीन मिळूनही कारागृहातून बाहेर पडता येणार नाही, काय कारण?

Satish Bhosle bail : वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला जामीन मंजूर झाला आहे. तरीही त्याचा मुक्काम जेलमध्येच राहणार आहे. तो बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे.
Satish Bhosale hunting case
Satish Bhosale hunting caseSarklarnama
Published on
Updated on

Khokya Bhai Beed : बीडमध्ये पैशांचे बंडल उधाळणारा भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

मात्र, सतीश भोसले उर्फ 'खोक्या' ला जामीन मिळाला असला तरी त्याचा मुक्काम जेलमध्येच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एकाच गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. बॅटने मारहाण प्रकरण, आणि ढाकणे कुटुंबावर जीवघेणा हल्ला या प्रकरणात अद्याप त्याला जामीन मिळालेला नाही. केवळ वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात सतीश भोसलेला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे खोक्याचा मुक्काम हा जेलमध्येच राहणार आहे.

सध्या खोक्या बीड कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे. खोक्याच्या घरावर पोलिसांनी व वनविभाने छापा टाकल्यानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे साहित्य, प्राण्यांचे मांस, गांजा आढळून आले होते. याप्रकरणी वकील राजन धसे यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार शिरूर कासार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.

Satish Bhosale hunting case
Balasaheb Thorat : शरद पवारांना भेटलेल्या त्या दोघांनी कशाचे संकेत दिले? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं..

वेगवेगळ्या प्रकरणांमुळे खोक्या चर्चेत आला होता. त्याचे पैशांचे बंडल उधाळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला बॅटने बेदम मारहाण करतानाचा खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यानंतर शिरूर येथील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सतीश भोसले वर दुसरा गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्याच्या घराची तपासणी केली असता वन्य जीवांचे मांस आढळून आल्याने त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Satish Bhosale hunting case
Suhas Kande : शब्द दिला… आणि पाळलाही ! आमदार कांदे यांच्या धडपडीने मनमाडला मिळाली अधिकृत MIDC

त्यानंतर खोक्या हा अनेक दिवस फरार होता. पोलिस त्याच्या शोधात होते. त्याला प्रयागराज मधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्याआधी पोलिसांनी वनविभागाच्या जागेवर असलेल्या त्याच्या घरावर बुलडोजर चालवला होता. त्यानंतर रात्री त्याच्या घराला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर खोक्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सतीश भोसले (खोक्या) हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवाशी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. समाज माध्यमांवर वेगेवगळे दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो चर्चेत आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com