Suhas Kande : शब्द दिला… आणि पाळलाही ! आमदार कांदे यांच्या धडपडीने मनमाडला मिळाली अधिकृत MIDC

Manmad MIDC approval : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मनमाड एमआयडीसी प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने अधिकृत औद्योगिक वसाहतीचा दर्जा दिला आहे. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे.
Suhas Kande
Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

Suhas Kande : नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मनमाडकरांना दिलेला शब्द खरा करुन दाखवला आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील युवकांसाठी व युवतींसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देईल असा शब्द आमदार कांदेंनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे.

कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड एमआयडीसी प्रकल्पाला अधिकृतरित्या औद्योगिक वसाहत म्हणून मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून मतदारसंघातील स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. फक्त मनमाडच नव्हे तर संपूर्ण नांदगाव तालुक्यातील औद्योगिक विकासाला त्यामुळे गती मिळणार आहे.

मनमाड शहरात हजारो तरुण बेरोजगार आहेत. त्यांना रोजगारासाठी नाशिक आणि मालेगावला जावे लागते. या सगळ्या तरुणांना एमआयडीसी प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देईल असा शब्द आमदार कांदेंनी दिला होता. मतदारसंघातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मनमाड शहरात अधिकृत एमआयडीसी व्हावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून आमदार कांदे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

Suhas Kande
Eknath Khadse : 'चेकाळणे' शब्दावरुन चाकणकर विरुद्ध खडसे युद्ध भडकलं, खडसे म्हणाले अर्थ गुगलवर तपासा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी हा प्रश्न मांडला होता. फडणवीसांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी याविषयावर चर्चा केली होती. त्यानंतर आमदार कांदेंनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यानंतर आता कांदे यांच्या अथक प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनकवाडे, सटाणे परिसरास अधिकृतरित्या औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) म्हणून मान्यता मिळाली आहेत.

राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज विभागामार्फत मनमाड एमआयडीसीला अधिकृत मान्यता देणारा शासन निर्णय (जीआर) जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय शासनाचे सहसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात भाग चार 'ब'मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.

मनमाड-औरंगाबाद मार्गालगत असलेले अनकवाडे व सटाणे (ता. नांदगाव) येथील एकूण १२४.०८ हेक्टर क्षेत्रफळ औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये खासगी ११९.७२ हेक्टर व सरकारी ४.२९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Suhas Kande
Manmad APMC : भुजबळांचा जुना शिलेदार भाजपमध्ये आल्यावरही सुहास कांदेंना नडला; अल्पमत असूनही झुंजवलं

शासनाकडून मंजुरी मिळविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्याचे आमदार कांदेंनी सांगितलं आहे. मनमाड एमआयडीसीला औद्योगिक वसाहतीची अधिकृत मान्यता मिळणे हा मनमाडच्या विकासातील मैलाचा दगड आहे. मनमाड मनमाडवासीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे वचन मी दिलं होतं, दिलेला शब्द मी पाळला आहे. त्या दिशेने एक मोठा टप्पा पार पडला आहे. हा प्रकल्प मनमाडसह संपूर्ण तालुक्याच्या प्रगतीचा आधार ठरेल असं आमदार कांदेंनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com