Maharashtra Belgium investment : बेल्जियमच्या कंपन्यांसाठी महाराष्ट्राने टाकले ‘रेड कार्पेट’; देवेंद्र फडणवीसांचे मोठे लक्ष्य

CM Devendra Fadnavis invites Belgian companies to invest in Maharashtra amid expanding India-Belgium trade ties : भारत-EU FTAच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चर्चा; बेल्जियम PM बार्ट डी वेव्हर यांचे पॉलिश्ड हिऱ्यांवरील आयात शुल्क शून्य करण्याचे आवाहन
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

India Belgium trade : भारत आणि बेल्जियममधील व्यापार संबंध अधिक मजबूत होत असताना महाराष्ट्राने बेल्जियममधील कंपन्यांना राज्यात गुंतवणुकीसाठी ‘रेड कार्पेट’ टाकले आहे.

महाराष्ट्र 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, भारत-बेल्जियममधील वाढत्या व्यापारात राज्याचा मोठा वाटा असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर शुक्रवारी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आले होते. बीकेसीतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भारत-युरोपीय महासंघ (EU) मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियममधील व्यापार व गुंतवणुकीच्या संधींबाबत विस्तृत चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचीही या वेळी उपस्थिती होती.

भारताच्या (India) हिरे उद्योगासाठी महत्त्वाचा मुद्दा मांडताना बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी पॉलिश्ड हिऱ्यांसह विविध वस्तूंवरील आयात शुल्क शून्य करण्याचे आवाहन केले. भारत आणि बेल्जियममधील हिरे व्यापारासह विविध क्षेत्रांतील देवाणघेवाण आणखी वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि बेल्जियममधील सध्याचा द्विपक्षीय व्यापार सुमारे 13.01 अब्ज डॉलर आहे. पुढील पाच वर्षांत हा व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य दोन्ही देशांनी निश्चित केले आहे.

CM Devendra Fadnavis
Dada Bhuse powers : दादा भुसे यांच्या खात्यातील महत्त्वाचे अधिकार कमी; शिंदे शिवसेनेला धक्का?

भारत-EU मुक्त व्यापार करार हा सुमारे दोन दशकांच्या प्रयत्नांनंतर झालेला ऐतिहासिक करार असल्याचे बार्ट डी वेव्हर यांनी नमूद केले. या करारामुळे भारतीय उत्पादनांना युरोपीय बाजारपेठेत अधिक चांगला प्रवेश मिळण्याबरोबरच व्यापारातील अडथळे कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही भारत-EU मुक्त व्यापार कराराला युरोपीय महासंघातील सर्व 27 सदस्य देशांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. कराराच्या औपचारिक प्रक्रिया लवकर पूर्ण करून तो प्रत्यक्षात आणण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis
Municipal Bill Dispute : बदलापूर पालिकेत बिलांवरून राडा; नगरसेवक जिन्यावरून कोसळले, व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्राला फायदा होणार

महाराष्ट्राचा देशाच्या GDP मध्ये 15 टक्क्यांहून अधिक वाटा असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर भर दिला. 2030 पर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि व्यापारवाढ महत्त्वाची ठरणार आहे. भारत-बेल्जियम व्यापारातील वाढीचा फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

नवे परिणाम

विशेषतः हिरे, उत्पादन, तंत्रज्ञान, उद्योग आणि इतर व्यापार क्षेत्रांत बेल्जियमच्या कंपन्यांसाठी महाराष्ट्रातील संधी वाढू शकतात. भारत-EU FTA, बेल्जियमसोबत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य आणि महाराष्ट्राचे 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट यामुळे आगामी काळात महाराष्ट्र-बेल्जियम आर्थिक सहकार्याला नवे परिमाण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com