MLC election : विधानपरिषदेच्या भंडारा-गोंदियाच्या आखाड्यात भाजप-काँग्रेसमध्ये संख्याबळाचा खेळ तापला : राष्ट्रवादी ठरणार गेमचेंजर

local body constituency election News : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होत असल्याने महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.
Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
DCM Sunetra Pawar, CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीला अखेर मुहूर्त लागला आहे. आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून 18 जूनला मतदान होणार आहे. यात भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रिक्त जागेसाठी महायुती व महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला जागा जाण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीत काँग्रेसचा उमेदवार रिंगणात उतरवला जाणार आहे.

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचा इतिहास पहिला तर भाजपचे (BJP) परिणय फुके हे विजयी झाले होते तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी हे समीकरण नव्हते. सर्वजण स्वतंत्रपणे लढले होते. मात्र, या निवडणुकीत समीकरण बदलले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी करूनच या निवडणुका लढल्या जाणार असल्याचे संकेत आहेत. महायुतीत ही जागा भाजप लढते की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडते यावर निवडणुकीचे पुढील गणित अवलंबून असणार आहे.

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी या दोन जिल्ह्यात एकूण ४३७ मतदार आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्यात २१४ व भंडारा जिल्ह्यात २२३ मतदार आहेत. भंडारा जिल्ह्यात भाजपकडे ८५, काँग्रेसकडे (Congress) ४५, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ६० तर इतर ३३ इतके संख्याबळ आहे. गोंदिया जिल्ह्यात भाजपकडे ८० तर काँग्रेसकडे ६१ मतदार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३८ तर इतर व अपक्ष यांच्याकडे ३५ मते आहेत. दोन्ही मतदारसंघातून महायुतीकडे २६० इतकी मते आहेत तर काँग्रेसकडे १०५ व इतर व अपक्षाकडे ६८ मते आहेत. त्यामुळे याठिकाणी महायुतीसाठी ही लढत सोपी ठरणार आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
VidhanParishd Election: विधानपरिषदेचा धुराळा : परभणी-हिंगोलीतील 'स्थानिक'च्या गणितात राष्ट्रवादी वरचढ; एकनाथ शिंदेंपुढे जागा टिकवण्याचे आव्हान

या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी आणि इतरांची १६६ मते ही किंगमेकर ठरणार आहेत, कारण भाजप १६५ आणि काँग्रेस १०६ दोघांकडेही स्वबळावर बहुमताचा आकडा २१९ इतका नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व इतरांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच विजयी होता येणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून केवळ सध्या दोनच नावांची चर्चा आहे. यात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र प्रफुल अग्रवाल व माजी आमदार दिलीप बनसोड हे दोनच इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीत स्पर्धा कमी आहे. महायुतीकडून सध्या माजी खासदार सुनील मेंढे, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रकाश बाळबुध्दे, सुमित भालोटिया, सुनील फुंडे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे कोणाला निवडणूक रिंगणात उतरवले जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
BJP News : विधान परिषदेची निवडणूक जाहीर होताच परभणी-हिंगोलीवर भाजपचा दावा, जिल्हाध्यक्ष भुमरे म्हणतात, आमच्याकडे दीडशेवर मतदान!

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांचा गड मानला जातो तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे ही या मतदार संघावर प्रभुत्व राहिले आहे. त्यामुळे आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत पटोले-पटेल यांच्यापैकी नेमकी कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Related Stories

Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra fadnavis, ravindra chavan
devendra fadnavis eknath shinde sunetra pawar Mahayuti Government
Dy CM Sunetra Pawar, CM Devendra Fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com