Mumbai Crime News: दादागिरी करणाऱ्या मित्राला आठवीत शिकणाऱ्या तीन मुलांनी संपवलं! असं फुटलं हत्येचं बिंग

Bhandup Police Crime News:डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. पोलिसांनी संशयित मित्रांची चौकशी केली असता एकाने गुन्ह्याची कबुली दिली.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News: दादागिरी करतो, म्हणून मित्रालाच संपविण्याऱ्या तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. मुंबईतील भांडुप (Bhandup) परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सिद्धार्थ लोंढे (१४) असे या मृत मुलाचे नाव आहे.

तीनही आरोपी व मृत मुलगा हे आठवीत शिकत होते. तीन मुलांनीच त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याची तपासात उघड झाले आहे. तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालामुळे या खूनाचे बिंग फुटले. हत्या केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी मृतदेह तलावात फेकून तो बुडाल्याचा बनाव करण्यात आल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

हरवल्याची तक्रार

सिद्धार्थ हा तुळशेत पाडा परिसरात राहत होता. ता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला.रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने पालकांनी त्याची परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यांचा शोध लागला नाही. त्यानंतर तो हरवल्याची तक्रार त्याच्या पालकांनी भांडुप पोलिसांकडे केली.

मृतदेह सापडला

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच मुलुंड पोलिसांच्या हद्दीमध्ये विहार तलावाजवळ २३ फेब्रुवारीला सिद्धार्थचा मृतदेह सापडला.

Mumbai Crime News
Bal Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेसाठी दबाव होता..! ATSच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट

बुडाल्याचा बनाव

काही प्रत्यक्षदर्शीनी सिद्धार्थला त्याच्या एका मित्रासोबत शेवटचे पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आम्ही चौघे पोहायला गेलो होतो, त्यावेळेस सिद्धार्थ बुडाल्याचे तो सांगू लागला. इतर दोन मित्रांनीही चौकशीत हेच सांगितले. तो पोहत असताना बुडाल्याचे त्यांनी सांगितले, पण शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार तपासाची चक्रे फिरली.

बाल निरीक्षण गृहात रवानगी

सिद्धार्थ याच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. डोक्याच्या मागील बाजूस दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचेही अहवालात नमूद होते. पोलिसांनी संशयित मित्रांची चौकशी केली असता एकाने गुन्ह्याची कबुली दिली. दादागिरी करतो त्याला संपवल्याचे आरोपींनी सांगितले. पुढील कारवाईसाठी तिन्ही मुलांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. मारहाणीत वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com