Ranjan Taware : अजितदादांनी चंद्रराव तावरेंना पाच वर्षे चेअरमनपदाची ऑफर दिली होती : रंजन तावरेंचा दावा

Malegaon Sugar Factory Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी स्वतःचे नाव जाहीर केले. याचा अर्थ माळेगाव कारखान्याच्या वीस संचालकांमध्ये एकही व्यक्ती त्या पदासाठी पात्र नाही का?
Ranjan Taware-Chandraro Taware-Ajit Pawar
Ranjan Taware-Chandraro Taware-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati, 15 June : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चंद्रराव तावरे यांच्यावर टीका केली होती. ते ४५ वर्षे संचालक होते, पण त्यांना अजूनही वयाच्या ८५ व्या वर्षीही संचालकपदाची हाव सुटेना, असा हल्लाबोल अजितदादांनी केला होता. त्याला रंजन तावरे यांनी उत्तर दिले आहे. ‘चंद्रराव तावरे यांना तुम्ही आमच्यासोबत या. आपण पॅनेल करू, तुम्ही पाच वर्षे चेअरमन व्हा,’ अशी ऑफर अजित पवारांनी चंद्रराव तावरेंना दिली होती, असा गौप्यस्फोट रंजन तावरेंनी केला.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या (Malegaon Sugar Factory Election) निमित्ताने अजित पवार यांनी शनिवारी बारामती सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी विरोधक चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला रंजन तावरे यांनी उत्तर दिले आहे. तसेच, चेअरमनपदी मीच पाच वर्षे राहीन असे विधान केले होते. त्याबाबत तावरे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, त्यांनी माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी स्वतःचे नाव जाहीर केले. याचा अर्थ माळेगाव कारखान्याच्या वीस संचालकांमध्ये एकही व्यक्ती त्या पदासाठी पात्र नाही का?

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पॅनेल निवडून आले तर ते चेअरमन होतील. कारण, माळेगावच्या निवडणुकीत आमचे पॅनेल निवडून येईल, त्यामुळे त्यांच्या चेअरमनपदाची घोषणा ही जर तर वर अवलंबून राहणार आहे. तसेच, माळेगाव कारखान्याच्या सभासदांना सर्वाधिक भाव देण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या छत्रपती साखर कारखान्यात भाव का दिला नाही. ते मृगजळ आहे, असा दावाही रंजन तावरेंनी (Ranjan Taware) केला.

चंद्रराव तावरे यांच्या वयाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतीक अधिकार नाही. पण, त्यांचा आम्ही महायुती म्हणून लोकसभा आणि विधानसभेत प्रचार केला होता. पण माळेगावच्या निवडणुकीत त्यांनी ‘चंद्रराव तावरे यांना तुम्ही आमच्यासोबत या, आपण पॅनेल करू. तुम्ही पाच वर्षे चेअरमन व्हा. म्हणजे चंद्रराव तावरेंना पाच वर्षे ते चेअरमन करायला तयार आहेत, त्या वेळी त्यांना चंद्रराव तावरेंचे ८५ वर्षांचे वय चालते. पण, विरोधात पॅनेल केल्यानंतर ते अजित पवार (Ajit Pawar) यांना चालत नाही, असा टोलाही रंजन तावरेंनी लगावला.

Ranjan Taware-Chandraro Taware-Ajit Pawar
Jalil Attack Shirsat : इम्तियाज जलील यांनी शिरसाटांना शिंगावरच घेतले; म्हणाले, ‘तुम्ही मला निवडणुकीत पाडले, आता मी तुमच्या मागे लागणार’

तावरे म्हणाले, अजित पवार तुम्ही 1984 मध्ये छत्रपती साखर कारखान्याचे संचालक झालात. आपण अगोदर छत्रपती साखर कारखाना, खासगी कारखान्यांत उसाला सर्वाधिक बाजारभाव द्यावा; मग ‘माळेगाव’बाबत बोला.

Ranjan Taware-Chandraro Taware-Ajit Pawar
Omraje Nimbalkar : पवारांनी सांगितलं म्हणून उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये सगळंच मान्य केलं नाही : ओमराजेंनी उलगडली महाआघाडी स्थापनेवेळीची गोष्ट!

नवीन गोदामाचे पत्र निकृष्ट टाकले होते, त्यामुळे पावसात ते फुटले आणि माळेगाव कारखान्याच्या ४५ हजार साखर पिशव्या भिजल्या आहेत, हे वास्तव आहे. पण हे संचालक मंडळ आतापर्यंत खोटे बोलत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सभासद सुज्ञ आहे. त्यांनी कोणला संधी द्यायची, हे ठरविले आहे आणि कोणालाही संधी मिळाली तरी त्यांनी शेतकऱ्यांची सेवा करावी, असे आवाहन रंजन तावरे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com