मोठी बातमी : भिवंडीत भाजपचे 9 नगरसेवक फुटले; नारायण चौधरींच्या गटाचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा, महापौर निवडणुकीत ट्विस्ट

Bhiwandi mayor election News : महापौर निवडणुकीत ट्विस्ट पाहवयास मिळत असून भाजपच्या एका गटाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने आता सर्वांचे महापौर पदाच्या निवडणुकीकडे लाख लागले आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

Bhivandi News : भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत आता मोठी उलथापालथ होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपने महापौर पदाचा ऐनवेळी उमेदवार बदलल्याने ट्विस्ट आला आहे. भाजपने नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींच्या गटाच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीत ट्विस्ट पाहवयास मिळत असून भाजपच्या एका गटाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने आता सर्वांचे महापौर पदाच्या निवडणुकीकडे लाख लागले आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी रोज नव्या घडामोडी पाहवयास मिळत आहेत. त्यातच बुधवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडीमुळे भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीला नवे वळण लागले आहे. भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलला आहे. नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरी यांच्या गटाच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहवयास मिळत आहे.

BJP and Congress
ncp bjp alliance : सुनील तटकरे-रवींद्र चव्हाणांची भेट : रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर ZP ची समीकरण बदलणार? राष्ट्रवादी भाजपला सत्तेत बसवणार?

भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलून स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देत असल्याची अधिकृत घोषणा भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी केली. नगरसेवकांना लेखी पत्राद्वारे निर्णयाची माहिती देखील कळविण्यात आली. महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या नव्या बदलामुळे भिवंडीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

BJP and Congress
shivsena crisis : राजीनामा दिला अन् तडीपारी मिळाली! कोकणात शिंदेंच्या युवा चेहऱ्यावर पोलिसांचा घाव, राजकीय सूडाचा वास?

भिवंडीत भाजप (BJP) चंद्रपूर पॅटर्न राबवण्याची तयारी करत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवली पॅटर्ननुसार रणनीती आखली आहे. भिवंडीत सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस, भाजप, सेक्युलर फ्रंट आदी पक्ष इच्छुक आहेत. भिवंडी पालिकेत भाजपचे 22 शिवसेना शिंदे गटाचे 12, एक अपक्ष असे 35 चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी 46 चे संख्याबळ आहे. परंतु हा जादुई आकडा गाठण्यासाठी सगळ्याच पक्षांची तारांबळ उडाली आहे.

BJP and Congress
Sunetra Pawar NCP President : ‘तो’ दिवस ठरला! सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर : प्रफुल पटेलांनी सांगितली नेमकी तारीख

सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी जुळवाजुळव

दुसरीकडे काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि समाजवादी पार्टी असा सेक्युलर फ्रंट महापौरसाठी तयार झाला होता, पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना आपला महापौर बसविण्यासाठीची समीकरणे जुळत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता भाजपचा एक गट काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेऊन महापौर पदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला माजी महापौर विलास पाटील यांनी जवळीक साधल्याने मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. काँग्रेसकडे 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12 जागा, समाजवादी पक्ष 6, कोनार्क विकास आघाडी 5 असे संख्याबळ आहे.

BJP and Congress
Pune Congress Bhavan: महापौर मंजुषा नागपुरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेस हायकोर्टात जाणार; पहिला दगड कोणी भिरकावला? याचाही फैसला तिथंच होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com