shivsena crisis : राजीनामा दिला अन् तडीपारी मिळाली! कोकणात शिंदेंच्या युवा चेहऱ्यावर पोलिसांचा घाव, राजकीय सूडाचा वास?

tadipari action On uday samant group munna desai : जिल्हा परिषद निवडणुकीत हातखंबा गटातून झालेल्या जोरदार राजकीय घडामोडीनंतर केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर येथील राजकीय वातावरण अधिकच तापले होते.
shivsena crisis; uday samant And munna desai
shivsena crisis; uday samant And munna desaisarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दक्षिण रत्नागिरीतील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून परशुराम कदम यांच्या हकालपट्टीनंतर राजकीय वातावरण तापले आहे.

  2. केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे.

  3. या कारवाईमुळे उदय सामंत गटाला धक्का बसल्याची चर्चा असून ही कारवाई कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत आहे की राजकीय रणनीतीचा भाग, यावर वाद सुरू आहे.

ratnagiri News : नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत दक्षिण रत्नागिरीतील राजकारण चांगलेच तापले होते. शिवसेना नेते परशुराम कदम यांची हाकालपट्टी केल्यानंतर केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी बंडाचे निशान फडकावले होते. त्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख पदाचा तडकाफडकी राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. या राजीनाम्याने युवासेनेला भगदाड पडले होते.

या घटनेमुळे हातखंबा परिसरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असतानाच ग्रामीण पोलिसांनी मुन्ना देसाई यांच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. यामुळे आता पोलिसांनी केलेल्या कारवाई ही कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत बसणारी आहे की तिच्यामागे राजकीय गणिते दडली आहेत, यावर आता चर्चा रंगली आहे. तर मुन्ना देसाई यांच्यावरील कारवाईने पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का बसल्याचे मानले जात असून सामंत गटात खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान हातखंबा गटात वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. येथे शिवसेनेकडून सुयोग कांबळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने नाराजी उसळली होती. शिवसेना नेते तथा इच्छुक परशुराम कदम यांनी बंड पुकारत सामंत यांनाच आव्हान निर्माण केले होते. यामुळे त्यांची पक्षाने हकालपट्टी केली आणि स्थानिक पातळीवरील अंतर्गत संघर्ष उघड झाला.

shivsena crisis; uday samant And munna desai
Shivsena UBT crisis : ठाकरेंना रामराम ठोकलेला शिलेदार कमळ हाती घेणार? भाजप नेत्यासोबत फोटो समोर आल्याने राजकीय उलथापालथ

केदार ऊर्फ मुन्ना देसाई यांनी शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत जिल्ह्यात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या राजीनाम्याने युवासेनेला भगदाड पडले होते. तर सामंत यांच्या गटात गोंधळ उडाला होता. तर मुन्ना देसाई यांना कदम यांच्यावर पक्षाने केलेली कारवाई रूचली नसल्यानेच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती.

याच दरम्यान मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यांना थेट तडीपार केल्याने आता हातखंबा गटात वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तर पोलिसांनी त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले आहे. या कारवाईनंतर आता समर्थक आणि विरोधकांचा सूर वेगळाच आहे. “निवडणुका पार पडताच कारवाईचा वेग वाढला, हे योगायोग मानायचे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच विरोधी भूमिका घेतल्याची ही शिक्षा आहे का? जुनी प्रकरणे उकरून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही आता केला जातो आहे.

मात्र या साऱ्या घडामोडींनंतर ग्रामीण पोलिसांनी संभाव्य तणाव टाळण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई केल्याचे नमूद करत प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलल्याचे सांगितले आहे. तर एकेकाळी पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले देसाई यांना अशा प्रकारे अचानक लक्ष्य करण्यात आले असून असे का? ही कारवाई कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखालील नियमित प्रक्रिया की सत्तासंघर्षातील राजकीय सूड? असे सवाल आता विचारले जात आहेत.

shivsena crisis; uday samant And munna desai
Shivsena crisis : भास्कर जाधव पुन्हा बंडाच्या मूडमध्ये? पक्षावर नाराजी की मोठा राजकीय स्फोट!

FAQs :

1. मुन्ना देसाई यांच्यावर तडीपारीची कारवाई का करण्यात आली?
ग्रामीण पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे सांगितले आहे.

2. परशुराम कदम यांच्या हकालपट्टीचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
परशुराम कदम यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत अंतर्गत तणाव वाढला आणि त्यानंतरच पुढील राजकीय घडामोडी घडल्या.

3. उदय सामंत गटाला या कारवाईचा कसा फटका बसू शकतो?
मुन्ना देसाई हे सामंत गटाशी जवळीक असलेले मानले जात असल्याने या कारवाईमुळे त्या गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

4. ही कारवाई राजकीय आहे का?
अधिकृतपणे पोलिसांनी ती कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने केल्याचे म्हटले असले तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

5. पुढील राजकीय समीकरणांवर या घटनेचा परिणाम होईल का?
होय, स्थानिक पातळीवर शिवसेनेतील गटबाजी आणि आगामी राजकीय समीकरणांवर या प्रकरणाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com