Ncp Mlc Election : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला ! 'या' दिवशी होणार नावाची घोषणा

NCP candidate announcement News : भाजपने विधान परिषदेच्या तीन जागासाठीचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी रविवारी बैठक झाली.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. भाजपने विधान परिषदेच्या तीन जागासाठीचे उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला आलेल्या एका जागेसाठी रविवारी बैठक झाली. त्यामध्ये सोमवारी सकाळी 11 वाजता उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार निवडीसाठी रविवारी बैठक झाली. या बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब होणार होता. मात्र, आगामी काळातील नाराजीनाट्य टाळण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हे नाव घोषित करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

Ajit Pawar
Ajit Pawar : काँग्रेसला मोठा धक्का, दोन बडे नेते अजितदादांच्या गळाला; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला एकच जागा आली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानपरिषदेवर कोणाला पाठवणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर तीन नेत्यांना कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापैकी एकाचे नाव फायनल होणार आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या लाडक्या आमदारासाठी त्याग करूनही बसवराज पाटलांच्या पदरी पुन्हा निराशाच !

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर विधानसभेत गेल्याने एक जागा रिक्त आहे. विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या सूचना माजी आमदार झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या जागेसाठी कोअर कमिटीने नाव निश्चित केले आहे. या तीन नावांपैकी एकाचे नाव सोमवारी घोषित करण्यात येणार आहे.

Ajit Pawar
MLC Election : इच्छुकांने वाढवले फडणवीसांचे टेन्शन; विधान परिषदेसाठी तब्बल 20 नावे भाजपने पाठवली दिल्ली दरबारी; कोणाला मिळणार उमेदवारी?

दरम्यान, भाजपने रविवारी सकाळी त्यांच्या वाट्याला आलेल्या तीन जागेवरील उमेदवारांची घोषणा केली. भाजपने जुन्या-नव्याचा समतोल राखत माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर या तिघांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या एका जागेवरील उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ajit Pawar
MLC Election: भाजपच्या गोटातून मोठी अपडेट; विधानपरिषदेसाठी मराठवाड्याला संधी, 'या' दोनपैकी एक नाव होणार फायनल ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com