Ajit Pawar : काँग्रेसला मोठा धक्का, दोन बडे नेते अजितदादांच्या गळाला; प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

Congress setback News : येत्या काळात काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.
 Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. दिवसागणीस आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक माजी आमदारासह दुसऱ्या फळीतील नेते महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. येत्या काळात काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने (Bjp) 132 जागा जिंकल्या तर महायुतीनं तब्बल 232 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन पक्ष मिळून केवळ 46 जागा जिंकता आल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये इनकमिंग सुरू आहे. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसत असताना आता काँग्रेसलाही धक्क्यावर धक्के बसत आहेत.

 Ajit Pawar
Devendra Fadnavis: फडणवीसांच्या लाडक्या आमदारासाठी त्याग करूनही बसवराज पाटलांच्या पदरी पुन्हा निराशाच !

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे व माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्चला नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

 Ajit Pawar
Shivsena UBT : मुंबईत 'ते' बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना घरं नाकारतात; त्यावर 'मटण'वाले 'बाल हिंदुहृदयसम्राट' बोलणार का? ठाकरे गटाने राणेंना डिवचलं

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.

 Ajit Pawar
BJP : अवघ्या वर्षभराची आमदारकी... केचे अन् केनेकरांना खूश केलं की तोंडाला पाने पुसली?

काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता हा आणखी एक मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे येत्या काळात नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व वाढणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

 Ajit Pawar
MLC Election : इच्छुकांने वाढवले फडणवीसांचे टेन्शन; विधान परिषदेसाठी तब्बल 20 नावे भाजपने पाठवली दिल्ली दरबारी; कोणाला मिळणार उमेदवारी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com