Uddhav Thackeray News : उध्दव ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का; काय आहे प्रकरण?

Political News : राज्यातील धक्कातंत्रानंतर आता शिंदेंकडून ठाकरे गटाला राष्ट्रीय पातळीवर धक्का देण्यास सुरुवात...
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. मात्र, याचदरम्यान शिंदे गटाकडून मागील नऊ महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देणेच सुरु आहे.

आता त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उध्दव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्रिपुरा राज्यप्रमुख देवेंद्र प्रसाद यांच्या शिवसेना पक्षात नियुक्ती पत्र देत स्वागत केलं आहे.

Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar News : सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, ''जागावाटपाचा फॉर्म्युला टीव्हीवर...''

राज्यातील धक्क्यातंत्रानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला थेट राष्ट्रीय पातळीवर धक्का देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा प्रारंभ शिंदे यांनी थेट त्रिपुऱ्यातून केली आहे. त्रिपुऱ्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखाने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackeray
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती आज राजकीय स्फोट करणार?

मालेगावातील सभेआधीच ठाकरेंना धक्का

उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधील मालेगावमध्ये सभा होत आहे.यासभेच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे ठाकरे गटातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. 15 ते 20 महिला आघाडीच्या पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com