Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट : सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana September update News : राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे.
 Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.
Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यभरतील लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यामुळे आता लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. दिवाळीचा सण जवळ आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा महिलांना आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे.या योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम शासनाकडून देण्यात येऊ शकते.

 Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.
BJP Politics : पदवीधर निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी चेकमेट, राष्ट्रवादीचा मुख्य चेहराच फोडला

महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून म्हणजेच जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागले आहे. याच हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे.

 Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.
NCP Vs Shivsena : नगराध्यक्षाचे आरक्षण जाहीर होताच महायुतीत चुरस, इच्छुकांची नावे ही आली समोर

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करताना काही निकष ठेवण्यात आले होते. त्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळलं जाईल. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर गृहभेटी देऊन चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

 Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.
Mahayuti Final Plan: महायुतीचा स्थानिकसाठीचा 'फायनल' प्लॅन ठरला; सत्ता टिकवण्यासाठी तीन पक्षांची गुप्त रणनीती उघड!

ई केवायसी करावी लागणार

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करताना महत्त्वाचा निकष ठेवला होता, तो निकष म्हणजे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. आता लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं उत्पन्न निकषाप्रमाणं आहे की नाही हे शोधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

या ई केवायसी प्रक्रियेत लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार कार्डची पडताळणी करावी लागेल. याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची देखील पडताळणी करणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण करायची आहे.

 Ladki Bahin Yojana: 2 crore women eligible, 40.28 lakh found ineligible for scheme benefits.
Pune Congress : पुन्हा गटबाजी, पुन्हा वाद! निवडणुकीपूर्वीच केलेल्या 'त्या' नियुक्त्यांमुळे पुणे काँग्रेसमधील दोन गट आमने-सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com