
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून युद्धपातळीवर केली जात आहे. निवडणुकीच्या तयारीला सर्वच यंत्रणा लागली आहे. निवडणुका कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे फटाके दिवाळीपूर्वी फुटणार की दिवाळीनंतर याकडे याकडे लक्ष लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होत असलेल्या लढतीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यातील निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. निवडणूक आयोग चार टप्प्यात निवडणुका घेणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाकडून याबाबत अधिकृत घोषणा केल्यानंतरही सर्व स्पष्ट होईल. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महत्त्वाच्या शहरांत, जिल्ह्यांत पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी (MVA), प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत.
राज्यातील सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे. यासाठी महायुती (Mahayuti) की महाविकासआघाडीत निवडणूक लढायची? याबाबतही प्रत्येक पक्षात विचारमंथन सुरु आहे. त्यातून काय निर्णय घेतला जातो ते आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये दोन, तीन तर काही ठिकाणी 5 वर्षांपासून प्रशासनाकडून कारभार चालवला जातोय. निवडणुका न झाल्यामुळे तिथे सध्या प्रशासनाच्या अख्यत्यारित कामकाज सुरु आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने 2022 आधीचं आरक्षण कायम ठेवायचा आदेश देत निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. त्यानंतर निवडणूक आयोग तयारीला लागले आहे.
ऑक्टोबरमध्ये होणार मतदान?
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या चार टप्प्यात होणार असल्याची चर्चा आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
कोण बाजी मारणार उत्सुकता शिगेला ?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळाले होतं. पण त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. तर महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. यानंतर आता काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो? याबाबत उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.