Abu Azmi Controversy: अबू आझमीच्या तोंडून भाजपनेच उभा केला वाद; काँग्रेसच्या बड्या नेत्याने केला आरोप

BJP Congress Allegations News: अबू आझमी आणि भाजप हे एका नाण्याची दोन बाजू आहेत. अबू आझमीने एक पिल्लू सोडायचे आणि भाजपने हिंदू मुस्लिम भांडणे लावायची हे ठरलेले आहे.
Abu Azmi
Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : वारकऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते या समाजावादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून आझमी यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. मात्र, त्यांच्या तोंडून भाजपच हा वाद निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अबू आझमी आणि भाजप (BJP) हे एका नाण्याची दोन बाजू आहेत. अबू आझमीने एक पिल्लू सोडायचे आणि भाजपने हिंदू मुस्लिम भांडणे लावायची हे ठरलेले आहे. आझमी जे वक्तव्य करतो ते भाजपच्या इशाऱ्यावर करीत असल्याचा आपला स्पष्ट आहोत, असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Abu Azmi
MNS Target Uddhav Thackeray : राज ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची जीभ घसरली; 'पाय चाटले ..फाफडा..***' , संजय राऊतांच्या आडून उद्धव ठाकरे टार्गेट?

अबू आझमी (Abu Azami) कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा दबावातून हे बोलले आहेत. मुंबईसह राज्यात महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. याचा फयदा घेण्यासाठी हा वाद निर्माण केला जात असल्याचेही वडेट्टीवारांनी सांगितले. वारकरी यात्रेवर आजवर कोणीच कधी बोलले नाही. अबू आझमी यांनी सुद्धा यावर वक्तव्य केले नाही.

ही यात्राही याच वर्षी निघालेली नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा आहे. आता रस्ते प्रशस्त झाले आहेत. सगळीकडे पोलिसांचा चोख बंदबस्तो आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचाही प्रश्न नाही. असे असताना वारकऱ्यांमुळे कोंडी होते हे बोलणे खोडसळपणाचे आहे. मुद्दामच हिंदू- मुस्लिम वाद उकरण्यासाठी ते केले असावे याची दाट शक्यता असल्याचे वडेट्टीवारांचे म्हणणे आहे.

Abu Azmi
Thackeray Vs Shinde: निष्ठेचे सोडून विचार, सत्तेसाठी एक… लाचार! ठाकरेंच्या शिलेदाराचं पोस्टरबाजीला सडेतोड उत्तर

हिंदी भाषेच्या सक्तीबाबतही हेच धोरण भाजप महायुती सरकारचे असल्याचे दिसून येते. आधी हिंदी भाषा सक्तीचा आदेश काढला. नंतर तो मागे घेतला. नंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा सुधारित आदेश काढण्यात आला. यावरून विनाकरण वाद निर्माण केला जात असल्याचे दिसून येते, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

Abu Azmi
Thackeray Brothers Alliance : ठाकरे बंधुंची युती होणार की नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यांने तापले राजकारण

हिंदी भाषा ऐच्छिक असावी परंतु महाराष्ट्रातची बोलीभाषा मराठी हीच आहे. संतांच्या वाणीतून मराठी भाषा तयार झाली आहे. म्हणून जगात कुठेही गेले तरी एखाद्या माणसाने मराठी बोलली तर आपण चमकून मागे बघतो. मराठी भाषेतील संत परंपरा नष्ट करण्यास आमचा विरोध असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Abu Azmi
Tejaswi Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांनी फेरलं भाजपच्या मनसुब्यावर पाणी; संचालक होताच थेट मातोश्रीवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com