Raj-Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिवसेना-मनसे युतीबाबत मोठी अपडेट; बड्या नेत्याने केला गौप्यस्फोट

Shiv Sena MNS alliance News : मोर्चा रद्द झाला असला त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील नेत्यामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या चार महिन्यापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना-मनसे युतीबाबत चर्चा सुरु आहेत. लवकरच ठाकरे बंधू एकत्र येतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यातच हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या निमित्ताने ५ जुलै रोजी राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार होते. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन जीआर मागे घेतले. त्यामुळे मोर्चा रद्द झाला असला त्यानिमित्ताने दोन्ही पक्षातील नेत्यामध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

साम टीव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' कार्यक्रमात त्यांनी दिलेल्या मुलाखतीप्रसंगी ते बोलत होते. आम्ही मोर्चासाठी असेल अथवा आंदोलनासाठी असेल तसेच मोर्चाच्या निमिताने होत असलेल्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्ही एकत्र येत आहोत. त्यामुळे त्याचा अर्थ आमच्यात चर्चा सुरु आहे. संवाद होत आहे. आमच्यात उत्तम प्रकारे डॉयलॉग सुरु आहेत. संवाद सुरु झाला की अनेक अडथळे दूर होतात. कोणी कितीही अडथळे टाकण्याचे प्रयत्न केले तरी काही फरक पडणार नाही. ज्यावेळेस दोन प्रमुख नेत्यांमध्ये संवाद सुरु आहेत. ते तर दोन भाऊ आहेत. त्यामुळे ज्यावेळेस संवाद सुरु होतो. त्यावेळेस आम्हाला कोणत्याही संकटाची अथवा अडथळ्याची चिंता वाटत नाही, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sanjay Raut statement : संजय राऊतांचे मोठे विधान; ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शरद पवारांची गरज भासणार नाही

महायुती सरकारकडून हिंदी भाषा थोपवली जात होती. त्याला ठाकरे बंधूंनी विरोध केला. दोन्ही बंधूंची विचारधारा एक होती. दोघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी दंड थोपटले होते. आता दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. महायुती सरकारच्या निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नव्हता. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) या निर्णयविरोधात मैदानात उतरले असल्याचे राऊत म्हणाले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackery News : 'खळखट्याक' प्रकरणी पुरावा नाही; राज ठाकरेंविरोधातील खटला रद्द

दोन्ही भाऊ हे काय आज एकत्र आले नाहीत. ते जन्मापासून एकत्र आहेत. मधल्या काळात काही राजकीय मतभेद झाले असले तरी दोन्ही भावातील नाते काही तुटले नाहीत. नाती तुटत नसल्याने त्यांच्यातील बंध कधीच तुटले नाहीत. त्यामुळे कोणाला जर हे तात्पुरते वाटत असेल तर ते त्यांना वाटते, मला असे काहीच वाटत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्यासमोर सरकार झुकले; रणनीतीतील बदल की जनभावनेचा स्वीकार?

ठाकरे ब्रँडच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे का? असा प्रश्नाचे उत्तर देताना राऊत म्हणाले, मराठी माणसाच्या प्रश्नसाठी शिवसेनेची स्थापना झाली आहे. त्याच मुद्द्यावर आजही शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. त्या दृष्टीनेच राजकीयदृष्ट्या पावले पुढे पडत आहेत. त्यामुळे येत्या काळातही ठाकरे ब्रँड हा अबाधित राहील.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांचे एक पाऊल मागे अन् एकनाथ शिंदेंचे टेन्शन दूर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com