Sanjay Raut statement : संजय राऊतांचे मोठे विधान; ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी शरद पवारांची गरज भासणार नाही

Thackeray brothers unity News : 5 जुलैला ठरलेल्या दिवशीच एक विजयी मोर्चा काढला जाणार आहे. यात दोन्ही बंधू असतील. शिवतीर्थ किंवा वरळीत हा मोर्चा काढला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या निमित्ताने ५ जुलै रोजी राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार होते. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन जीआर मागे घेतले. त्यामुळे हा मराठी भाषिकांचा मोठा विजय आहे. त्यामुळे याचा विजयोत्सव येत्या काळात आम्ही एकत्र येऊन साजरा करणार आहोत. आमचे राज ठाकरे यांच्यासोबत बोलणे सुरु आहे. यामुळे 5 जुलैला ठरलेल्या दिवशीच एक विजयी मोर्चा काढला जाणार आहे. यात दोन्ही बंधू असतील. शिवतीर्थ किंवा वरळीत हा मोर्चा काढला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

त्यासोबतच येत्या काळात राज व उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी शरद पवार यांची गरज भासणार नाही. दोन बंधूंनीच एकत्र येण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एकत्र येण्यासाठी तिसऱ्या माणसाची गरज भासणार नाही, असे मोठे विधान राऊत यांनी केले.

साम टीव्हीच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' कार्यक्रमात खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची मुलाखत घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे बंधूनी एकत्रित यावे यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. त्यासाठी कोणत्याही नेत्यांनी मध्यस्थी करावी अशी परिस्थिती नाही. त्यासाठी कोणाचीही गरज भासणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधुंच्यासमोर सरकार झुकले; रणनीतीतील बदल की जनभावनेचा स्वीकार?

हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलैला सर्वपक्षीय मोर्चा निघणार होता. मात्र, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. त्यामुळे हा मोर्चाही रद्द झाला असला तरी येत्या काळात लवकरच विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन बंधू एकत्र येणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut
Raj Thackeray News : काही झाले तरी ठाकरे बंधू एकत्र येणारच! राऊतांच्या फोननंतर राज ठाकरेंकडून शिक्कामोर्तब

दोन्ही भाऊ हे काय आज एकत्र आले नाहीत. ते जन्मापासून एकत्र आहेत. मधल्या काळात काही राजकीय मतभेद झाले असले तरी दोन्ही भावातील नाते काही तुटले नाहीत. नाती तुटत नसल्याने त्यांच्यातील बंध कधीच तुटले नाहीत. त्यामुळे कोणाला जर हे तात्पुरते वाटत असेल तर ते त्यांना वाटते, मला असे काहीच वाटत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut
Shivsena UBT : शिवसेनेत नाराजीचा स्फोट; आदित्य ठाकरेंकडून अवहेलना; हर्षल सुर्वेंचा उद्धव ठाकरेंना रामराम

मराठी भाषेचा लढा हा राजकीयदृष्टया कमी असायला हवा. प्रत्येकाला मराठीचा लढा हा माझा वाटला पाहिजे. हे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मुंबईसहा महाराष्ट्र एकवटेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले होते. समाजवादी व काँग्रेसचे नेतेदेखील सहभागी झाले होते.

5 जुलैला सर्वपक्षीय मोर्चा निघणार होता. त्या मोर्चामध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते सहभागी होणार होते. राजकीय नेत्याशिवाय कोणीही यंत्रणा राबवू शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्व नेत्यांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, साहित्यिक व कलावंत सहभागी होणार होते, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांचे एक पाऊल मागे अन् एकनाथ शिंदेंचे टेन्शन दूर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com