Chandrashekhar Bawankule : प्रत्येक बुथवर 10 मतांची गरज, महायुती 200 हून अधिक जागा मिळवेल!

BJP Adhivetion Maharashtra Assembly Election 2024 : पुण्यात सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनामध्ये चंद्रशेखर बानवकुळे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune : भाजपच्या पुण्यातील अधिवेशनात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करताना त्यांना एका कार्यक्रमही दिला. राज्यात महायुतीचे सरकार आणायचे असेल तर प्रत्येक बुथवर दहा मतांची गरज असल्याचे विधान त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला. त्यानंतर रविवारी प्रदेश भाजपचे पहिलेच अधिवेशन होत आहे. यामध्ये बोलताना बावनकुळे यांनी मतांचं गणित मांडलं. युवा, महिलांना मोठ्या प्रमाणात पक्षात आणण्यासाठी काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
BJP Adhiveshan : 5 हजार कार्यकर्त्यांना भाजपने वाटलेल्या ‘या’ किटमध्ये आहे तरी काय ?

दोन ते चार हजारांच्या फरकाने आपण दहा लोकसभा हरल्या. 60 विधानसभा मतदारसंघात थोडा फरक पडला. आपण अजूनही 85 मतदारसंघात पुढे आहोत. पण जर प्रत्येकाने प्रत्येक बुथवर किमान दहा मत नोंदवली पाहिजे. महायुतीचा भगवा पुन्हा विधानभवनावर फडकवायचा असेल तर प्रत्येक बुथवर दहा मतांची गरज आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

तुम्ही जर दहा मतांचे राजकारण केले तर महाराष्ट्रात 200 च्यावर जागा महायुती जिंकेल. मला नेतृत्वावर, तुमच्यावर विश्वास आहे. कुणाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार करण्यासाठी आपण काम करत नाही. आपण एका निष्ठेने काम करत आहोत. त्यामुळे पुढील चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रध्दा ठेऊन काम करावे, अशी विनंती बावनमुळे यांनी नेते व कार्यकर्त्यांना केली.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ranjitsinh Mohite-Patil : लोकसभेपासून गायब झालेले रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या मंचावर अवतरले

महाविकास आघाडीला मिळणारे प्रत्येक मत म्हणजे महायुती सरकार आणि मोदी सरकारच्या योजना बंद करणार करणारे ठरेल. हे चुकून सत्तेत आले तर मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचे पाप हे सरकार करेल. लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठीच्या योजना बंद पाडतील, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत सर्व योजना बंद पाडल्या. त्यामुळे या योजन पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागणार आहे. राज्याच्या हितासाठी आपल्याला जिंकणे महत्वाचे आहे. देशात मोदींचे सरकार पुन्हा आले आहे. त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. इथून गेल्यानंतर प्रत्येक बुथवर नवीन संघटना बांधण्याचे काम करायचे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com