
Nagpur News : काँग्रेसचे स्थानिक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सोडण्याच्या विरोधात आहेत. हे बघता उद्धव सेना एकटी पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेने थोडाफार दिलासा मिळाला होता. ही आशाही धुसर झाली आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेचे नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष महापालिका निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे. भाजप आणि काँग्रेसने नागपूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहे. याचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सैनिकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.
राज ठाकरे सोबत येणार अशी चर्चा होती. ती सुद्धा फिस्कटली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव उद्या शनिवारी नागपूर महापालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी नागपूरला येत आहेत. ते काय चर्चा करणार आणि निर्देश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव सेनेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत स्थानिक नेत्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आघाडीचेही क्लिअर नाही आणि राज ठाकरे यांचेही क्लिअर नाही, काय करायचे आमचे आम्हालाच माहीत नाही, फक्त बैठका घेऊन काय होणार. यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत उद्वस सेनेने रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्या विधानसभेत वाढीव जागा मागितल्या होत्या. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या हक्काचा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघही हिरावून घेतला. ग्रामीणमध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघ उद्धव सेनेला दिला होता. तेथेही काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने बंडखोरी केली होती. हा असंतोष अद्यापही शिवसैनिकांमध्ये कायम आहे.
मध्यंतरी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही सर्वच महापालिका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. त्याचाही मोठा गहजब झाला होता. राऊत यांनी नागपूर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ठाऊक नाही, कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी केलेल्या घोषणेमुळे मोठी नाराजी निर्माण झाली होती.
काँग्रेसचे स्थानिक नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सोडण्याच्या विरोधात आहेत. हे बघता उद्धव सेना एकटी पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेने थोडाफार दिलासा मिळाला होता. ही आशाही धुसर झाली आहे. काहीच ठरले नसताना आणि क्लिअर नसताना बैठका घेऊन काय उपयोग अशी भावना उद्धव सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आता एक जिल्हा एक नेता असे धोरण ठरवले आहे. नागपूरमध्ये जागा वाटप, आघाडीसह निवडणुकीशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार भास्कर जाधव यांना दिले आहे. मात्र, आघाडीचा निर्णय करण्याचे अधिकार त्यांना नाही. जे काही व्हायचे ते मुंबईतून होईल. काँग्रेसने स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.