BJP Vs Shivsena : भाजप आमदाराने दिला फक्त 17 जागांचा प्रस्ताव : चिडलेल्या शिवसेना मंत्र्याकडून एक घाव दोन तुकडे!

Pratap Sarnaik On BJP and Shivsena alliance : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात रस्सीखेंच होताना दिसत आहे.
mira bhayandar municipal election; devendra fadnavis And Eknath Shinde
mira bhayandar municipal election; devendra fadnavis And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा निर्णय आता वरिष्ठ पातळीवर होणार आहे.

  2. जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठा पेच निर्माण झाला आहे.

  3. 20 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात युतीबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Mumbai News : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीचा निर्णय आता स्थानिक नेत्यांऐवजी वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठा पेच निर्माण झाला असून, येत्या २० डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरात होणाऱ्या मेळाव्यात याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भाजपकडे सध्या ६५ माजी नगरसेवक असल्याने एकूण ९५ जागांपैकी ६५ जागांवर लढण्यावर आमदार नरेंद्र मेहता ठाम आहेत. त्यांनी शिवसेनेला १७ जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. २०१७ मध्ये २२ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेने गेल्या आठ वर्षांत ताकद वाढल्याचा दावा करत ५० टक्के जागांची मागणी केली आहे.

दरम्यान आमदार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय वितुष्टामुळे स्थानिक पातळीवर चर्चेची दारे बंद झाली आहेत. परिणामी, युतीची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर येऊन पडली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील इतर महापालिकांच्या निर्णयासोबतच मिरा-भाईंदरचाही अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची चिन्हे आहेत.

mira bhayandar municipal election; devendra fadnavis And Eknath Shinde
BJP vs Shivsena UBT: 'मोदी-शहांना ज्या नावात रस होता, त्याला संघांची मान्यता नव्हती, नव्या अध्यक्षांच्या नेमणुकीने भाजपांतर्गत खळबळ...'

शिवसेनेला ६५-१७ प्रस्ताव देण्यात आला आहे, मात्र त्याबाबत शिवसेनेकडून अधिकृतरीत्या अद्याप काही सांगण्यात आलेले नाही.

- नरेंद्र मेहता, आमदार, भाजप

युतीबाबतची बोलणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. येत्या २० डिसेंबरला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त एकनाथ शिंदे मिरा-भाईंदरमध्ये येणार आहेत. त्या वेळी युतीसंदर्भात ते सूचना देतील.

- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

mira bhayandar municipal election; devendra fadnavis And Eknath Shinde
BJP Vs Shivsena : बोर्ड फाडले, लाथा घातल्या, कानाखाली मारल्या... वरळीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भाजप-ठाकरेंच्या सेनेत तुफान राडा

FAQs :

1. मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षांची युती आहे?
➡️ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट).

2. युतीचा निर्णय कोणी घेणार आहे?
➡️ स्थानिक नेत्यांऐवजी वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार आहे.

3. युतीबाबत अडचण कशामुळे आहे?
➡️ जागावाटपावरून दोन्ही पक्षांत पेच निर्माण झाला आहे.

4. 20 डिसेंबरला काय विशेष आहे?
➡️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मिरा-भाईंदरमध्ये मेळावा होणार आहे.

5. या मेळाव्यात काय अपेक्षित आहे?
➡️ भाजप–शिवसेना युतीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com